पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये डॉग पॉन्ड, नेहरुनगर याठिकाणी मृत भटके – मोकाट तसेच पाळीव छोटे प्राण्यांकरीता (श्वान, मांजर इ.) दहन मशिन स्थापित केलेली आहे. सद्यस्थितीत प्राणी दहन सेवा सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत देणेत येत आहे. दि. २६/०६/२०२५ पासून सदरचा कालावधी वाढवून सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत छोटे प्राणी (श्वान, मांजर इ.) दहन करण्याची व्यवस्था करणेत येत आहे. तरी पशुपालक व प्राणीप्रेमी यांनी याची नोंद घेऊन सदर सेवा घेण्याचे महानगरपालिकेमार्फत आवाहन करणेत येत आहे.


