Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedसीएमडीए पुणेच्या अध्यक्षपदी राहुल खुर्द यांची निवड

सीएमडीए पुणेच्या अध्यक्षपदी राहुल खुर्द यांची निवड

पुणे,४ जुलै २०२४ : भारतातील एकमेव आयएसओ प्रमाणित आयटी ट्रेड असोसिएशन असलेल्या कॉम्प्युटर्स अ‍ॅन्ड मीडिया डीलर्स असोसिएशन,पुणे (सीएमडीए) तर्फे वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या सभेमध्ये वर्ष २०२५-२६ करिता नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून राहुल खुर्द यांची सीएमडीए पुणेच्या अध्यक्षपदी तर सीबा पाठक यांची सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे. याबरोबरच नवीन कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष आनंद जगदाळे , खजिनदार योगेश गोडबोले, सहखजिनदार राजेंद्र पाटील, सहसचिव सचिन साळुंखे यांचा समावेश असेल. इतर समिती सदस्यांमध्ये नरेंद्र भेडा,विजय वाघमारे,संदीप जगदाळे, किरण फेरवानी, शशिकांत नेवासे,सतीश जगताप, चेतन सूचक यांचा समावेश आहे, तर सल्लागार समिती सदस्यांमध्ये महेश मोरे, रत्नेश राठी यांचा समावेश आहे.

 

 

याप्रसंगी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल खुर्द म्हणाले की,सीएमडीए ही ३३ वर्षे जुनी आयटी उपकरणे व्यापार संघटना आहे. सीएमडीए आपल्या सदस्यांसाठी व सर्वसामान्यांसाठी विविध उपक्रम हाती घेत असते.आयटी एक्स्पो हा आमचा प्रमुख उपक्रम असून महाराष्ट्रभरातील आयटी वितरक व व्यावसायिकांसाठी माहिती तंत्रज्ञानातील नवे कल सादर करण्यासाठी एक योग्य व्यासपीठ आहे. सामाजिक उत्तरदायित्व म्हणून सीएमडीए तर्फे विविध उपक्रम राबविले जातात,ज्यामध्ये सामाजिक संस्थांना तसेच गरजूंना आयटी उत्पादने दान केली जातात.येत्या काही काळात आम्ही राबवित असलेले उपक्रम सदस्यांना अधिक चांगले व्यावसायिक बनण्यास आणि समाजाप्रती त्यांच्या भूमिकेबद्दल अधिक जागरूक राहण्यावर लक्ष केंद्रित करतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments