पुणे, दि. १४ फेब्रुवारी : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ हेल्थ सायन्स आणि निश ( NICHE ) अँडव्होकसी फाउंडेशनतर्फे न्यूरोहार्मनी: न्यूरो-पुनर्वसन आणि न्यूरो-दुःखशमन या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन दि.१६ ते १८ फेब्रुवारी २०२४ रोजी, स्वामी विवेकानंद सभागृह, एमआयटी डब्ल्यूपीयू, कोथरूड येथे करण्यात आले आहे. न्यूरोहार्मनी तंत्रज्ञान हे न्यूरो-पुनर्वसन आणि न्यूरो-दुःखशमन शास्त्र या क्षेत्रांमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणणारे आधुनिक तंत्रज्ञान आहे. या कार्यशाळेसाठी विविध आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवर आणि व्यावसायिक एकत्र येणार आहेत. अशी माहिती कार्यशाळेचे मुख्य संयोजक प्रा. डॉ. मिलिंद पांडे यांनी दिली.
या तीन दिवसीय कार्यशाळेत न्यूरोहार्मनी तंत्रज्ञान हे न्यूरो-पुनर्वसन आणि न्यूरो-दुःखशमन शास्त्र या विषयावर संवाद सादरीकरणातून तंत्रज्ञानाच्या माहितीचे आदानप्रदान तसेच, तज्ञांचे मार्गदर्शनही होणार आहे. या कार्यशाळेत उद्घटनासह पाच सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. डॉक्टर, न्यूरोलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ, व्यावसायिक चिकित्सक, वाक्-भाषा चिकित्सक, सार्वजनिक आरोग्य तज्ञ, आपत्कालीन वैद्यकीय सेवा कर्मचारी, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता आणि समुपदेशक हे तज्ञ मार्गदर्शक म्हणून न्यूरोपॅथी, डिमेन्शिया, पार्किन्स, ब्रेन स्टोक, हेड इंजुरी, बॅक पेन, लर्निंग डिसेबिलिटी, समुपदेशन या विषयांवर चर्चा करतील. यामुळे वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि या सेवा क्षेत्रात काम करणार्या सर्वांनासाठीच ही कार्यशाळा महत्त्वाची ठरणार आहे.
नवीनतम संशोधन आणि उपचार पद्धतींवर चर्चा आणि माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करणे, रुग्णांच्या उपचार पद्धतींमध्ये सुधार घडवून आणण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांमध्ये सहकार्य वाढवणे, न्यूरो-पुनर्वसन आणि न्यूरो-दुःखशमन शास्त्र क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देणे हे या कार्यशाळेचे महत्वाचे उद्देश आहे.
या कार्यशाळेचे उद्घाटन भारती विद्यापीठ, पुणे च्या रेडिओलॉजी वैद्यकीय विभागाच्या उपसंचालिका डॉ. अरुंधती पवार यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी माईर्स एमआयटी चे संस्थापक अध्यक्ष, विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे असतील. तसेच समारोप सत्रात डॉ. निर्मल सूर्या व डॉ. शैलेंद्र गोस्वामी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी चे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड यांचे मार्गदर्शन या कार्यशाळेला लाभले आहे. दि. १८ फेब्रुवारी रोजीचे सत्र सर्वांसाठी खुले आहे.
उत्तम वैद्यकीय तंत्रज्ञानाद्वारे सुलभ आरोग्य सेवा देऊन वैद्यकीय सेवा क्षेत्राला लाभदायक बनवणे या उद्देशाने ही कार्यशाळा होत असून ही कार्यशाळा न्यूरो-पुनर्वसन आणि न्यूरो-दुःखशमन करणारी ठरेल अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी चे कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस आणि प्र. कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे यांनी दिली.
यावेळी निश ( NICHE ) अँडव्होकसी फाउंडेशन च्या कार्यकारी संचालिका व वरिष्ठ कार्यकारी अधिकारी डॉ. पौर्णिमा गौरी, सुमेधा कुलकर्णी, सुरेश कुलकर्णी, मानसी पराड तसेच एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी च्या हेल्थ सायन्स विभागाचे अधिष्ठाता डॉ. नीरज महिंद्रो, आयोजन सचिव डॉ. अश्विनी गिजरे, डॉ. अश्विन कुचेकर, शर्वरी देवधर व लिबरल आर्ट्स विभागाच्या अधिष्ठाता डॉ. प्रीती जोशी उपस्थित होत्या.
अधिक माहिती आणि नोंदणीसाठी https://neuroharmony.co.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.
एमआयटी डब्ल्यूपीयू आणि निश (छखउकए) अॅडव्होकसी फाउंडेशन तर्फे ‘न्यूरोहार्मनी: न्यूरो-पुनर्वसन आणि न्यूरो-दुःखशमन’ कार्यशाळेचे आयोजन
RELATED ARTICLES


