पुणे, दि. 29 : चांडोली येथील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना म्हशीचे शर्करायुक्त दुध पुरवठा करण्यासाठी पुरवठादारांकडून दरपत्रके मागविण्यात येत आहेत. इच्छुक पुरवठादारांनी दरपत्रके मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, चांडोली, ता. खेड, जि. पुणे, पिन – 410505 या पत्त्यावर बंद लिफाफ्यामध्ये पाठवावीत.
प्राप्त दरपत्रके पुढील कार्यवाहीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग, पुणे कार्यालयामध्ये पाठविण्यात येतील. प्राप्त दरपत्रकांपैकी एका दरपत्रकास मंजूरी देण्यात येईल व त्या पुरवठादारास वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दुध पुरवठा करण्याचे वार्षिक काम मिळेल, असे अधिक्षक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, चांडोली, ता. खेड, जि. पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
00000


