Tuesday, October 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedहिरो मोटोकॉर्पकडून मॅव्‍हरिक ४४० साठी किमतीची घोषणा देशभरातील ग्राहकांसाठी बुकिंग्‍जना सुरूवात

हिरो मोटोकॉर्पकडून मॅव्‍हरिक ४४० साठी किमतीची घोषणा देशभरातील ग्राहकांसाठी बुकिंग्‍जना सुरूवात

अपर प्रिमिअम विभागामधील नवीन युगाकडे वाटचाल करत हिरो मोटोकॉर्प ही जगातील स्‍कूटर्स व मोटरसायकल्‍सची सर्वात मोठी उत्‍पादक कंपनी आज १४ फेब्रुवारी २०२४ पासून त्‍यांची प्रमुख मोटरसायकल मॅव्‍हरिक ४४० साठी बुकिंग्‍जना सुरूवात करणार आहे.

ग्राहक नियुक्‍त करण्‍यात आलेल्‍या हिरो मोटोकॉर्प कस्‍टमर आऊटलेट्समध्‍ये, तसेच डिजिटली www.heromotocorp.com या वेबसाइटला भेट देत त्‍यांच्‍या मोटरसायकल्‍स बुक करू शकतात. ग्राहकांसाठी मोटरसायकलच्‍या डिलिव्‍हरींना एप्रिलपासून सुरूवात होईल.

वर्षातील बहुप्रतिक्षित मोटरसायकल देशभरातील हिरो मोटोकॉर्प डिलरशिप्‍समध्‍ये बेस, मिड आणि टॉप या तीन व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये उपलब्‍ध असेल, ज्‍यांची किंमत अनुक्रमे १९९,००० रूपये (बेस), २१४,००० रूपये (मिड) व २२४,००० रूपये (टॉप)* आहे.

*किमती संपूर्ण भारतात एक्‍स-शोरूम आहेत.

कंपनी ‘वेलकम टू मॅव्‍हरिक क्‍लब ऑफर’ देखील लाँच करत आहे. ही ऑफर १५ मार्चपूर्वी मॅव्‍हरिक ४४० बुक करणाऱ्या ग्राहकांसाठी उपलब्‍ध असेल. ग्राहकांना १०,००० रूपये किमतीच्‍या अॅक्‍सेसरीज व मर्चंडाइजचे कस्‍टमाइज्‍ड मॅव्‍हरिक किट मिळेल.

मॅव्‍हरिक ४४० हिरो मोटोकॉर्पच्‍या मिडल-वेट मोटरसायकल विभागातील उल्‍लेखनीय प्रवेशाला सादर करते, ज्‍यामधून कंपनीची नाविन्‍यता आणि सर्वोत्तमतेप्रती कटिबद्धता दिसून येते. २३ जानेवारी रोजी जयपूरमध्‍ये हिरो वर्ल्‍ड २०२४ येथे उत्‍स्‍फूर्त अपेक्षेसह अनावरण करण्‍यात आलेल्‍या या डायनॅमिक मोटरसायकलमध्‍ये कार्यक्षमता, स्‍टाइल आणि अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचे अद्वितीय संयोजन आहे.

शक्तिशाली इंजिन, रहदारीमध्‍ये चपळ असण्‍यासह लांबच्‍या अंतरापर्यंत अत्‍यंत प्रबळ व आरामदायी प्रवासाची खात्री देणारी मॅव्‍हरिक ४४० प्रेरणादायी राइडिंगच्‍या पूर्णत: नवीन विश्‍वाचा अनुभव देते, तसेच विशिष्‍ट, आधुनिक व उत्‍साही डिझाइन आणि ऑल-मेटल बॉडीसह रस्‍त्‍यांवर सर्वांचे लक्ष वेधून घेते.

हिरो मोटोकॉर्पचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्री. निरंजन गुप्‍ता म्‍हणाले, ”आमचा प्रिमिअम प्रवास उत्‍साहवर्धक असण्‍यासह आता ग्राहकांसाठी बहुप्रतिक्षित मॅव्‍हरिक ४४० च्‍या बुकिंग्‍जना सुरूवात झाली आहे. हार्ले-डेव्हिडसन एक्‍स४४० आणि करिझ्मा एक्‍सएमआर यांच्‍या दर्जाशी समानुपाती असलेल्‍या मॅव्‍हरिक ४४० मध्‍ये मस्‍कुलर अॅण्‍ड युथफुल मॉडनर्न रोडस्‍टरचे अद्वितीय तत्त्व आहे. ही मोटरसायकल आता प्रिमिअममधील आमच्‍या यशस्‍वी प्रवासाला अधिक पुढे घेऊन जाईल. या विस्‍तारीकरणामधून मोटरसायकल उत्‍साहींच्‍या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करणारी अपवादात्‍मक उत्‍पादने वितरित करण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. आम्‍ही आमच्‍या सूक्ष्‍मदर्शी ग्राहकांच्‍या विविध पसंतींची पूर्तता करण्‍याचा प्रयत्‍न करतो.”

मॅव्हरिक ४४०

डिझाइन

मॅव्‍हरिक ४४० मोटरसायकल स्टाइल आयकॉन आहे. विशिष्‍ट लुक, फ्रण्‍ट फॉरवर्ड माससह आर्किटेक्‍चर तत्त्वासह निर्माण करण्‍यात आलेल्‍या आकर्षक व लक्षवेधक डिझाइनमुळे दुरूनच मोटरसायकल ओळखता येते. या मोटरसायकलमध्‍ये अद्वितीय रोडस्‍टर आकर्षकता व प्रबळ स्‍टायलिंगचे सुरेख संयोजन आहे, ज्‍यामधून रस्‍त्‍यावर लक्षवेधक उपस्थिती व उत्‍साही अपील दिसून येतो. जवळून पाहिले असता आयकॉनिक वैशिष्‍ट्ये पाहायला मिळतात, जसे मस्‍कुलर फ्यूएल टँक, मेटल स्‍टायलिंग बॉडी पार्टस् जसे फ्रण्‍ट फेण्‍डर, श्राऊड्स, फ्यूएल टँक, इंटरअॅक्टिव्‍ह टेलिमॅटिक्‍स इन्‍स्‍ट्रूमेंट्स आणि रूंद हँडलबार्स. राइडला पूरक असा एक्‍झॉस्‍ट सिस्‍टममधील वैशिष्‍ट्यपूर्ण व कॅरेक्‍टरफूल साऊंड आहे. राइड करताना समोरील बाजूस पुरेशा प्रकाश दिसण्‍यासाठी मोटरसायकलमध्‍ये ऑल एलइडी लायटिंग सेटअपसह राऊंड एलईडी प्रोजेक्‍टर हेडलाइट्स, डेटाइम रनिंग लाइट्स आणि स्‍टाइल व सुरक्षिततेसाठी इंटेलिजण्‍ट इल्‍यूमिनेशन आहे.

शक्‍ती आणि कार्यक्षमता

शक्तिशाली मॅव्‍हरिक ४४० मध्‍ये एअर कूल्‍डसह ऑईल कूलर २ व्‍होल्‍ट सिंगल-सिलिंडर ४४० सीसी ‘टॉर्कएक्‍स’ इंजिन आणि इलेक्‍ट्रॉनिक फ्यूएल इंजेक्‍शन आहे. हे लाँग-स्‍ट्रोक इंजिन ६००० आरपीएममध्‍ये २७ बीएचपी शक्‍ती आणि ४००० आरपीएममध्‍ये ३६ एनएम टॉर्क वितरित करते. विशेषत: उच्‍च लो-एण्‍ड टॉर्कसाठी डिझाइन करण्‍यात आलेले ९० टक्‍क्‍यांहून अधिक सर्वोच्‍च टॉर्क फक्‍त २००० आरपीएममध्‍ये उपलब्‍ध होते, जे शहरातील व महामार्गावरील प्रवासादरम्‍यान सुलभ व विनासायास राइडचा आनंद देते.

कार्यक्षमतेसंदर्भात मॅव्‍हरिक ४४० मध्‍ये ६-स्‍पीड ट्रान्‍समिशनसह स्लिप-अॅण्‍ड-असिस्‍ट क्‍लच आहे. विशेषरित्‍या डिझाइन केलेले ०० स्‍टील रॅडियल पॅटर्न टायर्स रस्‍त्‍यांवरील अत्‍यंत तीव्र वळणावर उत्तम सपोर्टची खात्री देतात.

तडजोड न करता आरामदायीपणा

आरामदायीपणा लक्षात घेत निर्माण करण्‍यात आलेल्‍या मॅव्‍हरिक ४४० मध्‍ये रोडस्‍टर एर्गोनॉमिक्‍ससह अपराइट राइडिंग पोझिशन, एैसपैस सीट, अधिक लेगरूम आणि सानुकूल ग्रॅब-रेल्‍स आहेत, ज्‍यामुळे राइडर व सह-प्रवासीसाठी प्रवास आरामदायी होण्‍याची खात्री मिळते. हँडलबार्स आरामदायी ग्रिप, अधिक नियंत्रण व मनुव्‍हरेबिलिटी देतात. तसेच, एर्गोनॉमिकली डिझाइन करण्‍यात आलेल्‍या राइडर सीटमध्‍ये प्‍लश ६० मिमी फोम आहे, ज्‍यामधून आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळतो, तसेच आकर्षक स्‍टाइलसह शक्तिशाली कार्यक्षमता सामावलेली आहे.

पुढील व मागील बाजूस शक्तिशाली १७-इंच व्‍हील्‍ससह १७५ मिमीचे ग्राऊंड क्‍लीअरन्‍स असलेली मॅव्‍हरिक ४४० रोड-हगिंग क्षमतांमध्‍ये अग्रस्‍थानी आहे, ज्‍यामधून विशेषत: शहरातील रस्‍त्‍यांवर सर्वसमावेशक व सुरक्षित राइडची खात्री मिळते. मोठे टायर्स, ट्रेलिस फ्रेम आणि ४३ मिमी डाय टेलिस्‍कोपिक फ्रण्‍ट फोर्क्‍स स्थिरतेची खात्री देतात, तर नियंत्रित व सुलभ राइडसाठी प्रीलोडेड ७-स्‍टेप ट्विन शॉक्‍स आहेत. उच्‍च-कार्यक्षम ब्रेक सिस्‍टम कार्यक्षमपणे गती कमी होण्‍याची आणि शॉर्ट ब्रेकिंग अंतरांची खात्री देते.

इंटरअॅटिव्‍ह टेलिमॅटिक्‍स वैशिष्‍ट्ये

डिजिटल स्‍पीडोमीटरसह निगेटिव्‍ह डिस्‍प्‍ले रिडेबिलिटी मेनू नेव्हिगेशन व ऑपरेटिंग कन्‍सेप्‍टसंदर्भात नवीन विश्‍वाचा अनुभव देतात. यामध्‍ये स्‍मार्टफोन फिचर (फोन बॅटरी स्‍टेटस, मिस कॉल अलर्ट, ब्‍ल्‍यूटूथ मॅसेज अलर्ट), इनकमिंग कॉल अलर्ट, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, लो फ्यूएल इंडीकेटर, आरटीएमआय डिस्‍प्‍ले, डिस्‍टन्‍स टू एम्‍प्‍टी अशा सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांचा समावेश आहे.

इंटेलिजण्‍ट व कनेक्‍टेड अनुभवाचा शोध घेणाऱ्या राइडर्ससाठी मॅव्‍हरिक ४४० अत्‍याधुनिक ईसिम-आधारित कनेक्‍टीव्‍हीटीसह नवीन मानक स्‍थापित करते. हे वैशिष्‍ट्य रिअल-टाइम माहिती, रिमोट ट्रॅकिंग आणि कनेक्‍टेड २.० तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातून ३५ हून अधिक फंक्‍शन्‍सची उपलब्‍धता देते. ईसिम कार्यक्षमता एकसंधी कनेक्‍टीव्‍हीटीची खात्री देते, ज्‍यामुळे राइडिंगचा शक्तिशाली व इंटेलि‍जण्‍टली कनेक्‍टेड अनुभव मिळतो.

कलर स्किम

मॅव्‍हरिक ४४० पाच रंगांच्‍या पर्यायांमध्‍ये उपलब्‍ध असेल, जे तीन व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये येतील. बेस व्‍हर्जन आर्क्टिक व्‍हाइट रंगामध्‍ये उपलब्‍ध आहे. मिड व्‍हेरिएण्‍ट सेलेस्टियल ब्‍ल्‍यू आणि फिअरलेस रेड या दोन रंगांमध्‍ये उपलब्‍ध आहे. टॉप व्‍हेरिएण्‍ट फॅन्‍टॅम ब्‍लॅक आणि एनिग्‍मा ब्‍लॅक रंगाच्‍या पर्यायांमध्‍ये उपलब्‍ध आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments