पुणे — दिनांक 12 ऑगस्ट 2025 — तळजाई टेकडीवरील अखिल योग मित्र तळजाई परिवार यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या कृषिमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल खास सत्कार करण्यात आला .
राज्याचे कृषिमंत्री दत्तामामा भरणे पुण्यात असले कि, दररोज तळजाई टेकडीवर फिरण्यासाठी येतात. अखिल योग मित्र तळजाई परिवाराचे योगसाधक राजाभाऊ जाधव यांच्या हस्ते श्री भरणे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला.
या सत्काराला उत्तर देताना श्री दत्तामामा भरणे म्हणाले कि, नागरिकांनी दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे. त्यामुळे तुमची प्रकृती उत्तम राहील. तळजाई टेकडीवर स्वच्छ हवा व शुद्ध हवा असल्याने नागरिकांना त्याचा फायदा होतो.
महाराष्ट्रातील शेती टिकून त्याचा फायदा शेतकरी, व नागरिकांना होईल यादृष्टीने आपण प्रयत्न करणार असल्याचे श्री भरणे यांनी यावेळी सांगितले.
माजी नगरसेवक व पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे (उपमुख्यमंत्री अजित पवार गट ) अध्यक्ष श्री सुभाष जगताप यावेळी बोलताना म्हणाले कि, तळजाई टेकडीवरील वणवा रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहे. येथे लवकरच अग्नी शामकदलं केंद्र उभारण्यात येणार आहे.
याप्रसंगी आंतरराष्ट्रीय योग गुरु अरुण येवले, सेवानिवृत्त कृषी अधिकारी सतीश कोंडे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे दत्तात्रय गायकवाड, सुरेश निकम, अविनाश पासलकर, विलास खोपडे, विजय पायगुडे, गणेश कडू, दादा निकम, बिभीषण निवगुणे आदी योगसाधक उपस्थित होते.
राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांचा तळजाई टेकडीवर योग साधकांकडून सत्कार.
RELATED ARTICLES


