Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedमोतीबाग येथे जयंत उमराणीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण*

मोतीबाग येथे जयंत उमराणीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण*

*
पुणे – स्वातंत्र्यदिनी शनिवार पेठेतील मोतीबागेत निवृत्त पोलिस महासंचालक जयंत उमराणीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. भारतीय संस्कृती संवर्धक संस्था आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कसबा भागाच्या वतीने शुक्रवारी (दि. 15) स्वातंत्र्यदिनानिमित्त सकाळी ७.४५ वाजता ध्वजारोहण होईल. याप्रसंगी केशव सभागृहात आयोजित कार्यक्रमात एकता मासिकाच्या काश्मीर विशेषांकाचे प्रकाशन होईल. तसेच कै. दामूअण्णा दाते संदर्भ ग्रंथालयाचे उद्घाटन ज्येष्ठ प्रचारक, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य सुहासराव हिरेमठ यांचे हस्ते होणार आहे. अशी माहिती भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेचे अध्यक्ष राजीव जोशी आणि रा.स्व. संघाच्या कसबा भागाचे संघचालक अॅड. प्रशांत यादव यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments