Saturday, September 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedसुयोग पर्ल सोसायटी येथे पीएम - सुर्यघर योजना अंतर्गत सौर उर्जा प्रणाली...

सुयोग पर्ल सोसायटी येथे पीएम – सुर्यघर योजना अंतर्गत सौर उर्जा प्रणाली कार्यान्वित

पुणे,20 ऑगस्ट 2025 : हडपसर येथील सुयोग पर्ल को-ऑपरेटिव्ह सोसायटी येथे ऑन-ग्रीड रूफटॉप सोलर पीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.पीएम – सुर्यघर सब्सिडी योजनेअंतर्गत लाभ मिळालेल्या या प्रणालीचा वापर कॉमन मीटरसाठी केला जाणार आहे.यासाठी सोसायटीत 40 किलोवॅट क्षमतेची प्रणाली बसविण्यात आली असून सौरउर्जेद्वारे लिफ्ट व पाणीपुरवठा पंप्सना सौर उर्जा मिळेल.या प्रणालीचे उद्घाटन राहुल तुपे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बिपिन इंजिनिअर्सचे व्यवस्थापकीय संचालक हेमंत रेवणकर,सोसायटीचे अध्यक्ष सीवाकुमार,खजिनदार ललित जैन,सचिव मनोहर आणि इतर सदस्य उपस्थित होते.सौर उर्जा प्रणाली कार्यान्वित करण्याआधी वीज बिल साधारण 1 लाख रूपयापर्यंत यायचे,मात्र आता 80 टक्क्यांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.ही गुंतवणूक भरून येण्यासाठी साधारण तीन वर्षाचा कालावधी लागेल.

सौर उर्जा प्रणालीचे उद्घाटन हे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या (एमएससीडीसीएल) सौर उर्जा ग्राम या नव्या उपक्रमाशी सुसंगत आहे. बिपिन इंजिनिअर्सचे सरव्यवस्थापक पुष्कर गोखले यांनी या प्रणालीबाबत तांत्रिक माहिती दिली,तसेच सोसायटीच्या सदस्यांना याचे विविध लाभ व देखरेखीसाठी मार्गदर्शक सूचना याबाबत देखील मार्गदर्शन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments