Saturday, September 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedअॅबॉट आणत आहे प्रत्येक मिनिटाला सातत्याने ग्लुकोज मोजणारे तसेच आवश्यकता भासल्यास...

अॅबॉट आणत आहे प्रत्येक मिनिटाला सातत्याने ग्लुकोज मोजणारे तसेच आवश्यकता भासल्यास इशारे देणारे नेक्स्ट-जेन फ्रीस्टाइल लिब्र टू प्लस

पुणे, भारत, ऑगस्ट २१, २०२५– अॅबॉट या जागतिक आरोग्यसेवा कंपनीने आज फ्रीस्टाइल लिब्र टू प्लस सेन्सर बाजारात आणत असल्याची घोषणा केली. फ्रीस्टाइल लिब्र सेन्सर पोर्टफोलिओमध्ये अॅबॉटने ही नवीन भर घातली आहे. हे नवोन्मेष्कारी उपकरण दर मिनिटाला स्वयंचलितपणे ग्लुकोज मोजून ती आकडेवारी थेट तुमच्या फोनवर पाठवते, त्यामुळे मधुमेही व्यक्तींना त्यांच्या प्रकृतीचे व्यवस्थापन आत्मविश्वासाने, अचूकपणे व सुलभतेने करण्याची क्षमता प्राप्त होते. मधुमेही व्यक्ती स्कॅनिंगशिवाय त्यांचे ग्लुकोज रीडिंग बघू शकतात, आणि ग्लुकोजची पातळी वाढली किंवा कमी झाली असेल तर त्यांच्या अनुकूल स्मार्टफोनवर स्वयंचलितपणे इशारेही प्राप्त करू शकतात, जेणेकरून त्यांना या माहितीच्या आधारे आवश्यक ते निर्णय घेता येतील.

भारतात १०१ दशलक्ष लोक मधुमेहासह जगत असून, मधुमेहींच्या संख्येबाबत जगात देशाचा क्रमांक दुसरा आहे. या प्रचंड संख्येमुळे ‘कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग (सीजीएम)’सारखी रिअल-टाइम साधने उपलब्ध करून देण्याची गरज तातडीने भासत आहे. जेणेकरून, लोकांना त्यांच्या मधुमेहाचे व्यवस्थापन आत्मविश्वासाने तसेच सक्रियपणे करता यावे. सुयोग्य उपचारांसोबतच ग्लुकोज मॉनिटरिंग ही देखील मधुमेहाचे व्यवस्थापन करण्याची आणि गुंतागूंत टाळण्याची गुरूकिल्ली आहे.

“अॅबॉटचे आद्य फ्रीस्टाइल लिब्र तंत्रज्ञान जगभरातील सात दशलक्षांहून अधिक लोकांच्या मधुमेह व्यवस्थापन पद्धतीत बदल घडवून आणत आहे. हा आयुष्य बदलून टाकणारा नवोन्मेष भारतात आणणे आमच्यासाठी थरारक अनुभव आहे. आपल्या अवस्थेचे व्यवस्थापन अधिक चांगल्या पद्धतीने करण्याची क्षमता लोकांना देण्यासाठी येथे मोठा वाव आहे,” असे अॅबॉटच्या मधुमेह विभागाच्या आशिया पॅसिफिक प्रदेशाचे रिजनल मेडिकल अफेअर्स डायरेक्टर डॉ. केनेथ ली म्हणाले. “सर्व लोकसंख्यागटांतील तसेच ग्लायसेमिक श्रेणींमधील रुग्णांमधील ग्लुकोज रीडिंग खात्रीशीर व्हावे म्हणून फ्रीस्टाइल लिब्र टू प्लस अचूकतेचे ठोस मानक पूर्ण करणारी कामगिरी करते नेहमीच्या फिंगरस्टिक्सचा वापर न करता ग्लुकोजची पातळी तपासत राहण्याची मुभा हे उपकरण लोकांना देते. ग्लुकोजची पातळी सातत्याने समजत राहिल्याने लोकांना निर्णय घेण्यात मदत होते.”

रक्तातील साखरेची पातळी कमी होण्याच्या घटना ४३ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात फ्रीस्टाइल लिब्र तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते, हे अभ्यासांमधून दिसून आले आहे, एचबीएवनसी पातळीमध्ये यामुळे ०.९ टक्के ते १.५ टक्के घट झाली आहे आणि रुग्णांना भासणारी रुग्णालयांत जाण्याची गरजही यामुळे ६६ टक्क्यांनी कमी झाली आहे. टाइप वन मधुमेहासह जगणाऱ्या लोकांना तीव्र स्वरूपाच्या हायपरग्लॉसिमियामुळे होणाऱ्या कार्डिओव्हस्क्युलर गुंतागूंतींचा धोका लिब्र तंत्रज्ञानामुळे ७८ टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून आले आहे तसेच इन्शुलिनचे उपचार सुरू असलेल्या टाइप-टू मधुमेहाच्या रुग्णांमधील पक्षाघाताचा तसेच मधुमेहाशी निगडित गुंतागूंतींचा धोका ४४ टक्क्यांनी कमी झाला आहे. त्याचप्रमाणे मधुमेही व्यक्तींची काळजी घेणाऱ्यांनाही रिअल-टाइम इशाऱ्यांच्या सुविधेमुळे मन:शांती मिळत आहे, परिस्थिती बिकट होण्यापूर्वीच हस्तक्षेप करण्याची संधी मिळत आहे.

फ्रीस्टाइल लिब्र टू प्लस उपकरण कसे काम करते?

फ्रीस्टाइल लिब्र टू प्लस हे उपकरण नीअर-फील्ड कम्युनिकेशन (एनएफसी) आणि ब्ल्यूटूथ तंत्रज्ञानाचा वापर करून सातत्याने ग्लुकोजविषयक माहिती अनुकूल (कम्पॅटिबल) स्मार्टफोन्सना पाठवत राहते.हे संवेदक उपकरण (सेन्सर) १५ दिवसांसाठी दंडाच्या मागील बाजूस लावले जाऊ शकते आणि अनुकूल फोनचा उपयोग करून एका झटपट स्कॅनद्वारे ते सक्रिय केले जाऊ शकते. मधुमेही व्यक्तींना दर मिनिटाला त्यांच्या शरीरातील ग्लुकोजच्या पातळीचा अंदाज येऊ शकतो. यात मागील कल व नमुने नोंदवले जातात आणि ग्लुकोज पातळी खाली जात आहे की वर चढत आहे हे दर्शवणारे बाण यात आहेत, फिंगरस्टिक न वापरता हे रीडिंग घेतले जाते. अल्पवयीन रुग्णांचे पालक किंवा त्यांची काळजी घेणाऱ्या व्यक्ती यांनाही रुग्णाच्या ग्लुकोजविषयीची आकडेवारी स्वयंचलितरित्या प्राप्त होऊ शकते आणि त्यानुसार कस्टमाइझ करण्याजोगे इशारे लावून शांतपणाने ते आपली कामे करू शकतात. याशिवाय, फ्रीस्टाइल लिब्रलिंक वापरणारे लोक ही माहिती त्यांच्या डॉक्टरांना तसेच काळजी घेणाऱ्या व्यक्तींना लिब्र व्ह्यू व लिब्रलिंकअप आदी साधनांद्वारे पाठवू शकतात. ही डिजिटल साधनेही फ्रीस्टाइल लिब्र प्लॅटफॉर्मचाच भाग आहेत.

लिब्र व्ह्यू ही एक सुरक्षित, क्लाउडवर आधारित मधुमेह व्यवस्थापन प्रणाली आहे, ती ग्लुकोजविषयक माहिती डॉक्टरांना कळवण्यात रुग्णांना मदत करते, जेणेकरून, त्यांना वेळेत हस्तक्षेप करणे शक्य होऊ शकते. लिब्रलिंकअप हे पालक व काळजी घेणाऱ्या व्यक्तींसाठी मोबाइल अॅप आहे. मधुमेहासोबत जगणारी मुले, वयस्कर व्यक्ती तसेच जवळच्या व्यक्ती यांच्या ग्लुकोज पातळीचा इतिहास व कल ते या अॅपद्वारे सहजतेने समजू घेऊ शकतात.

“मला तंत्रज्ञानाच्या शक्तीबाबत नेहमीच विश्वास वाटत आला आहे. मात्र, योग्य साधन आपले आयुष्य कसे बदलून टाकू शकते हे मला माझ्या सासूबाईंना मधुमेहाचे निदान झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने कळले. त्यांच्या रक्तातील साखरेच्या पातळीत अचानक घट झाली तर काय अशी चिंता आम्हाला सतत वाटायची. विशेषत: रात्रीच्या वेळी किंवा त्या एकट्या असताना असे काही झाले तर काय, अशी चिंता आम्हाला सतावायची,” अभिनेत्री व इन्फ्लुएन्सर समीरा रेड्डी सांगतात. “फ्रीस्टाइल लिब्र टू प्लस वापरायला लागल्यापासून हे सगळे बदलून गेले. रिअल-टाइम अचूक अपडेट्स, इशारे, पूर्वीचे कल तपासण्याची क्षमता हे सर्व मिळाल्यामुळे आम्हाला मधुमेहावर नियंत्रण सोपे वाटू लागले आहे. मी आता कामासाठी निश्चिंतपणे बाहेर जाऊ शकते, त्या ठीक असतील असा विश्वास मला असतो. त्यांचाही आत्मविश्वास वाढला आहे आणि त्या स्वतंत्रपणे जगू शकत आहेत. अशा प्रकारची ग्वाही मिळणे महत्वपूर्ण असते.”

फ्रीस्टाइल लिब्र टू प्लस आता भारतभरात सर्वत्र उपलब्ध आहे. हे उपकरण प्रौढांसाठी व २ वर्षांवरील मुलांसाठी वापरले जाऊ शकते, गरोदरपणात मधुमेह झालेल्या स्त्रियांसाठीही ते वापरले जाऊ शकते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments