Saturday, September 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedसंधीची समान उपलब्धता’ हे स्वातंत्र्य व लोकशाहीचे वैशिष्ट्य असल्याने, महिला व तरुण...

संधीची समान उपलब्धता’ हे स्वातंत्र्य व लोकशाहीचे वैशिष्ट्य असल्याने, महिला व तरुण वर्ग कर्तृत्व सिद्ध करतात काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी यांचे मत*

 

 

पुणे : भारतातील लोकशाही व्यवस्थेमुळे व बँकांच्या राष्ट्रीयकृत घोरणांमुळे भारत आज विकसनशील देशांपैकी एक आहे. मात्र स्वातंत्र्यवेळी देशातील साक्षरतेचे प्रमाण खूप कमी होते. कालांतराने राजीव गांधी यांच्या काळात देशात रोजगार पुरक शिक्षण व्यवस्था व  संगणक व इंटरनेट क्रांती झाली. अन् डिजिटल इंडियाची पायाभरणी झाली. यातून आपल्याला दिसून येते की देशात महिला आणि तरुणांना स्वातंत्र्य दिले तर ते कर्तृत्व सिद्ध करतात, असे मत कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळदादा तिवारी यांनी व्यक्त केले.

 

शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत संगणक आणि सॉफ्टवेअर कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या एन. एम. डी . प्रा. लि. आणि एन. एम. डी. इन्फॉटेकच्या आठव्या वर्धापन दिनी ते बोलत होते. यावेळी आमदार विक्रमसिंह पाचपुते, राष्ट्रवादी कॉँग्रेस अजीत पवार पक्षाच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील, श्रॉफ ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि चेअरमन जे. पी. श्रॉफ, अभिनेत्री प्रार्थना बेहरे, वरिष्ठ पोलिस अधिकारी पी. आय वाघमारे, एनएमडी ग्रुपचे संस्थापक नवनाथ मोहन दरेकर, प्रशांत दरेकर आदी उपस्थित होते.

 

पुढे बोलताना गोपाळदादा तिवारी म्हणाले, नुकतेच झालेल्या सिंदूर ऑपरेशन मधील कर्नल सोफिया असेल किंवा  येथे शेतकऱ्यांच्या मुलांना पाठबळ देणारा नवनाथ दरेकर सारखा तरुण असेल त्यांनी हे दाखवून दिले आहे. त्यामुळे सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील तरुणांना आपल्या स्वप्नांना आकार देण्याचे बळ लाभले.

 

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे म्हणाली, मी जेव्हा जेव्हा परराज्यात किंवा परदेशात जाते तेव्हा मराठी उद्योजक दिसत नाही. मराठी माणूस उद्योक, व्यावसाव करू शकत नाही, असं बोललं जात पण आज मला मराठी असल्याचा अभिमान वाटतोय. एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी आज येथे मिळाली आहे.

 

एन. एम. डी. प्रा. लि. आणि एन. एम. डी. इन्फॉटेक च्या वतीने शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत संगणक आणि सॉफ्टवेअर कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. आजपर्यंत आम्ही २५०+ समाधानी क्लायंट्सचा विश्वास संपादन केला असून ५०००+ विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले आहे. यापैकी २०००+ विद्यार्थ्यांना MNC मध्ये नोकरीची संधी मिळाली आहे, ही आमच्यासाठी आनंद आणि अभिमानाची बाब आहे. भविष्यात आम्ही एआय (Artificial Intelligence) क्षेत्रातील क्लायंट्स मिळवून भारताला सर्वोच्च शक्ती बनविण्याच्या दिशेने योगदान देणार आहोत,” असे मनोगत नावनाथ दरेकर यांनी व्यक्त केले.

 

प्रशांत दरेकर म्हणाले, नवनाथ यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील एका खेड्यांत शालेय शिक्षण घेतले. पुढे पुण्यात येऊन कष्टाने स्वतचे वेगळे स्थान निर्माण केले, नाव कमावले.  आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून ट्याने शेतकऱ्यांच्या मुलांसाठी मोफत तंत्रज्ञान प्रशिक्षण देण्याचा अभिनव उपरं राबविला, यातून हजारो कुटुंबाचा टॉ आधार बनला आहे, त्यांची वाटचाल पुढेही अशीच सुरू राहो अशा सदिच्छा त्यांनी दिल्या.

 

या प्रसंगी यशस्वी विद्यार्थ्याना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा पाटील यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments