Tuesday, September 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedबीएनसीए' मध्ये 'निसर्ग संगतीत भूदृश्यकला' या पदव्युत्तर डिप्लोमासाठी प्रवेश सुरू

बीएनसीए’ मध्ये ‘निसर्ग संगतीत भूदृश्यकला’ या पदव्युत्तर डिप्लोमासाठी प्रवेश सुरू

पुणे, दि. ४ : महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनमधील (बीएनसीए) भूदृश्यवास्तूकला (लॅण्डस्केप) विभागातर्फे ‘निसर्गसंगतीत भूदृश्यकला’ (लॅण्डस्केप विथ नेचर) हा पदव्युत्तर डिप्लोमा ( पोस्ट ग्रॅज्युएट पदविका) अभ्यासक्रम सप्टेंबर २०२५ या महिन्यात सुरू होत आहे. त्यासाठी मर्यादित २० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

 

एका वेगळ्या धर्तीवरचा, पुरोगामी पद्धतीने राबवण्यात येत असलेला, खास महिलांसाठी योजलेला हा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा असणार आहे. त्यासाठी कोणत्याही शाखेचे पदवीधर ग्राह्य धरले जातील. पर्यायी श्रेयांवर आधारित सातत्यपूर्ण अंतर्गत मूल्यमापन होऊन त्यानुसार प्रमाणपत्र दिले जाईल. कर्वेनगर परिसरातील बीएनसीए महाविद्यालयातील भूदृश्य वास्तूकला विभागात याचे मिश्र पद्धतीने शिक्षण देण्यात येईल. त्यामध्ये तज्ज्ञांचे ‘ऑनलाईन’ तसेच प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळेल.

 

या संबंधी माहिती सांगताना बीएनसीएच्या भूदृश्यवास्तूकला विभागप्रमूख डॉ. स्वाती सहस्रबुद्धे म्हणाल्या की, या अभ्यासक्रमात विद्यार्थिनींच्या बॅचलर (पदवी) स्तरावरील ज्ञानप्राप्तीनुसार लवचिक पद्धतीने शिकण्याची संधी असून क्रेडीट पद्धतीने गुणांक दिले जातील. पर्यावरण, शाश्वतता आणि निसर्ग प्रणालीवर आधारित हा अभ्यासक्रम तयार केला असून दृश्य तसेच अन्य तांत्रिक पद्धतीने तो शिकवण्यात येईल. यामध्ये निरीक्षण, विश्लेषण व दस्तावेजीकरणासाठी लागणारी कौशल्ये विकसित करण्यात येत असल्याने त्याचा वापर निसर्ग क्षेत्रातील कामांमध्ये अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी होऊ शकेल. प्रत्यक्ष शिक्षण तसेच कार्यशाळा आणि संबंधित ठिकाणांना भेटी (फिल्ड व्हिजीट) तसेच या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन या अभ्यासक्रमातून लाभणार आहे.

 

अधिक माहितीसाठी संपर्क – mukta.kulkarni@bnca.ac.in

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments