*
पुणे, दि. १४: विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्यातील आदिवासी, दूर्गम भागातील नागरिकांपर्यंत केंद्र शासनाच्या योजना आकर्षक एलईडी रथाद्वारे पोहोचविण्यात येत असून ही यात्रा दुर्गम भागातील पाड्यापर्यंत पोहोचत असल्याने अनेक आदिवासी बांधवांना याचा लाभ झाला.
या यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना सिकलसेल, ॲनिमिया निर्मूलन मोहिम, एकलव्य आदर्श निवासी शाळांमध्ये नावनोंदणी, शिष्यवृत्ती योजना, वन हक्क नियम: वैयक्तिक आणि सामुदायिक जमीन, वन धन विकास केंद्र, १५ नोव्हेंबर आदिवासी गौरव दिवस म्हणून साजरा करणे, पर्यटन केंद्रे विकसित करण्यासाठी असलेली स्वदेश दर्शन योजना, हागणदारी मुक्त ओडीएफ प्लस योजना, विमुक्त, भटक्या आणि निमभटक्या जमातींसाठी असलेले विकास आणि कल्याण मंडळ आदींबाबत माहिती देण्यात आहे. आदिवासी समुदायासाठी असलेल्या योजनांच्या जनजागृतीचे ध्येय या विकसित भारत संकल्प यात्रेतून साध्य होण्यास मदत होणार आहे.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, पीएम भारतीय जन औषधी परियोजना, , पीएम जन धन योजना, , पीएम जीवन ज्योती विमा योजना, , पीएम सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, पीएम-स्वनिधी योजना, प्रधानमंत्री आयुष्यमान योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, हर घर जल-जलजीवन मिशन, किसान क्रेडीट कार्ड, सही पोषण, देशन रोशन आदी विविध योजनांचा लाभ देण्यासोबत शासकीय योजनेची माहिती पुस्तिका, भिंतीपत्रिकेचे वाटपही करण्यात येत आहे.
केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची माहिती ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन आंबेगाव तालुक्यात आयोजन करण्यात आले आहे. ही संकल्प यात्रा २६ जानेवारी २०२४ पर्यंत सूरू राहणार आहे. आतापर्यंत १९ ठिकाणी या यात्रेचे आयोजन करण्यात आले असून याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विविध गावात ठिकठिकाणी या यात्रेचे स्वागत करण्यात येत आहे.
यात्रेदरम्यान प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्ड, प्रधानमंत्री आयुष्यमान योजनेअंतर्गत आभा कार्ड वाटप करण्यात आले. आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजनही करण्यात येत असून गरजू नागरिकांनी या शिबाराचा घेतला आहे.
आंबेगाव तालुक्यात १५ डिसेंबर रोजी कोंढवळ, निगडाळे व तेरुगण, १६ डिसेंबर रोजी राजेवाडी, पोखरी व सुपेधर, १७ डिसेंबर रोजी साल व आंबेगाव गावठाण तर १८ डिसेंबर रोजी काळेवाडी, दरेकरवाडी व गवारवाडी तसेच १९ डिसेंबर रोजी साल आणि तळेकरवाडी गावात ही यात्रा येणार असून नागरिकांनी यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज यांनी केले आहे.


