Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedछत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२४ कार्यक्रमाचा समारोप...

छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२४ कार्यक्रमाचा समारोप…

पिंपरी, दि. २० फेब्रुवारी २०२४ :- महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन शहरातील विविध भागात करण्यात आले होते. सोमवारी १९ फेब्रुवारी रोजी या प्रबोधन पर्वाचा समारोप झाला.

भक्ती-शक्ती निगडी येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ३०० कलाकार, घोडे, उंट, बैलगाडी यांचा समावेश असलेल्या ३ मजली सेटवरील सलग तीन दिवस चाललेल्या शिवसह्याद्री या महानाट्याला हजारो नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

या महानाट्यास आयुक्त शेखर सिंह यांच्यासह त्यांच्या मातोश्रीही उपस्थित होत्या. तसेच माजी नगरसदस्य सचिन चिखले,मारूती भापकर, उत्तम केंदळे, राहुल कलाटे,उप आयुक्त मिनीनाथ दंडवते, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते जीवन बोराडे, सागर तापकीर ,अभिषेक म्हसे, हेमंत शिर्के,सचिन बोराडे , रोहिदास शिवनेकर , सागर लष्करे , कुणाल कांबळे , अनिकेत रसाळ, वैभव कुऱ्हाडे, निलेश शिंदे, रवी सोळंके, दादा पाटील, धनाजी येळकर, संतोष पाचपुते, ज्ञानेश्वर लोभे, स्वप्नील शिंदे, भावेश काचा,अतुल वरपे, राजेंद्र पवार, संतोष बादाडे, अजय पताडे, विनायक जाधव, युवराज सुरवसे, सुरेंद्र मगर, पंकज पाटील, विशाल बोगाळे, संग्राम मगर, गिरीश देवरे, आदित्य सोळंके, गणेश काळे, श्रीनिवास सोळंके, सुरेंद्र होके, रोहित शिंदे, शुभम पाटील, साईराज बोराडे, गणेश सरकटे, सुभाष पिंगळे, सुभाष ठाकर, ओंकार पवळे, उत्तम केंधळे आदी उपस्थित होते.

दरम्यान, शनिवारी संभाजीनगर, चिंचवड येथे व्याख्याते तात्यासाहेब मोरे यांचे ‘प्रेरणा शिवचरित्राची’ या विषयावरील तसेच डांगे चौक येथे व्याख्याते राजेंद्र कांबळे यांचे ‘आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावरील व्याख्यान पार पडले. तर एच.ए. कॉलनी पिंपरी येथे शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन’ या विषयावरील व्याख्यान पार पडले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments