Sunday, August 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारतात सर्विसनाऊ युनिव्‍हर्सिटी लाँच, १ दशलक्ष विद्यार्थ्‍यांना भविष्‍यासाठी सुसज्‍ज एआय कौशल्‍यांसह सक्षम...

भारतात सर्विसनाऊ युनिव्‍हर्सिटी लाँच, १ दशलक्ष विद्यार्थ्‍यांना भविष्‍यासाठी सुसज्‍ज एआय कौशल्‍यांसह सक्षम करणार

हैदराबाद, २५ सप्‍टेंबर २०२५ – आज, सर्विसनाऊ या व्‍यवसाय परिवर्तनासाठी एआय प्‍लॅटफॉर्मने सर्विसनाऊ युनिव्‍हर्सिटीच्‍या लाँचची घोषणा केली. हा नाविन्‍यपूर्ण शैक्षणिक अनुभव एआय-संचालित विश्वामध्‍ये महत्त्वपूर्ण कौशल्‍यांमधील तफावत दूर करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. हैदराबादमध्‍ये सर्विसनाऊ एआय स्किल्‍स समिटमध्‍ये या युनिव्‍हर्सिटीचे अनावरण करण्‍यात आले, जेथे १,२०० विद्यार्थी प्रत्‍यक्ष आणि देशभरातील २०,००० हून अधिक सहभागी व्‍हर्च्‍युअली एकत्र आले.

 

या इव्‍हेण्‍टमध्‍ये एआयसीटीई, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, फ्यूचर स्किल्‍स प्राइम, नॅसकॉम, तामिळनाडू स्किल डेव्‍हलपमेंट कॉर्पोरेशन, सर्विसनाऊ युनिव्‍हर्सिटी अकॅडेमिक पार्टनर्स आणि सर्विसनाऊ इकोसिस्‍टम पार्टनर्स यांच्‍या प्रतिनिधींनी सहभाग घेतला.

 

समिटमध्‍ये सर्विसनाऊने २०२७ पर्यंत भारतातील १ दशलक्ष विद्यार्थ्‍यांना अपस्किल करण्‍याचा आपला दृष्टिकोन दर्शवला, जेथे जगभरातील ३ दशलक्ष विद्यार्थ्‍यांपर्यंत पोहोचण्‍याच्‍या त्‍यांच्‍या जागतिक महत्त्वाकांक्षेमध्‍ये भर झाली. सध्‍या, प्‍लॅटफॉर्मचे ३१८,००० सक्रिय विद्यार्थी, ११६,००० प्रमाणित व्‍यावसायिक आणि प्रोग्राम्‍स आहेत, जे युनिव्‍हर्सिटीच्‍या विद्यार्थ्‍यांना रोजगारासाठी सुसज्‍ज होण्‍यास आणि सहयोगी व ग्राहक मागणीला पाठिंबा देण्‍यासाठी लवकर करिअर हायरिंगच्‍या माध्‍यमातून प्‍लेसमेंटमध्‍ये मदत करतात. सर्विसनाऊने भारतात कुशल टॅलेंट निर्माण करण्‍यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. सर्विसनाऊ इंडिया टेक्‍नॉलॉजी अँड बिझनेस सेंटरचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक सुमीत माथूर म्‍हणाले, “कंपन्‍या झपाट्याने एआयचा अवलंब करत आहेत, पण या परिवर्तनाला गती देण्‍यासाठी पुरेसे कुशल व्‍यावसायिक नाहीत. आमच्‍या संशोधनामधून निदर्शनास येते की, एआय अनपेक्षित गतीने कामाच्‍या पद्धतीमध्‍ये बदल घडवून आणत असताना देखील भारतातील २६ टक्‍के कंपन्‍या त्‍यांच्‍या कर्मचाऱ्यांसाठी गरजेचे असलेल्‍या कौशल्‍यांबाबत अनिश्चित आहेत. सर्विसनाऊ युनिव्‍हर्सिटी ही अनिश्चितता दूर करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे.

 

आमची प्रत्‍येक समस्‍येसाठी उत्तर देण्‍याची नाही तर सुस्‍पष्‍टता आणण्‍याची आणि विद्यार्थ्‍यांना आत्‍मविश्वासाने अवलंब करण्‍यास सुसज्‍ज करण्‍याची भूमिका आहे. उद्योगांसाठी सर्वात आवश्‍यक असलेल्‍या क्षमता – एआय ओघ, समस्‍या-निवारण आणि मोठ्या प्रमाणात नाविन्‍यता यावर लक्ष केंद्रित करत आम्‍ही भारतातील प्रतिभावान व्‍यक्‍तींना अडथळ्यांना संधीमध्ये बदलण्‍यास मदत करू शकतो. आमचा दृष्टिकोन साधा आहे: भावी एक दशलक्ष एआय-सुसज्‍ज व्‍यावसायिकांना सक्षम करणे, जे भावी कामकाज पद्धतींचे नेतृत्‍व करतील.”

 

एजेंटिक एआय आणि भारतातील कौशल्‍यामधील वाढती तफावत

 

२०२५ सर्विसनाऊ एआय स्किल्‍स रिसर्चनुसार, एजेंटिक एआय २०३० पर्यंत भारतातील १०.३५ दशलक्षहून अधिक रोजगारांना नवीन आकार देण्‍याची अपेक्षा आहे. तसेच, भारतात पुढील पाच वर्षांमध्ये ३ दशलक्ष नवीन टेक कर्मचाऱ्यांची भर होण्‍याीच अपेक्षा आहे, ज्‍याला एआय लाटेमुळे गती मिळेल.

 

उत्‍पादन, रिटेल व शिक्षण यांसारखे उद्योग आधीच कर्मचारीवर्गामध्‍ये मोठे परिवर्तन अनुभवत आहेत, जेथे उद्योग भविष्‍य-केंद्रित भूमिकांचा शोध घेत आहेत, ज्‍यामध्ये एआय, डिझाइन आणि डेटा अॅनालिटिक्‍सचे संयोजन आहे. भारत सरकारचे नॅशनल स्किल गॅप स्‍टडी देखील मोठी कमतरता निदर्शनास आणते, जेथे २०० हजार ते २२५ हजार डेटा इंजीनिअर्स आणि ४० हजार ते ५० हजार डेटा सिक्‍यु‍रिटी व्‍यावसायिकांसाठी मागणी अजूनही पूर्ण झालेली नाही.

 

सर्विसनाऊ युनिव्‍हर्सिटी भविष्‍यासाठी सुसज्‍ज, एआय-केंद्रित कौशल्‍यांना आकार देणार

 

सर्विसनाऊ युनिव्‍हर्सिटी सर्वोत्तम विद्यार्थी अनुभव आहे, जी व्‍यक्‍तींना विकसित होण्‍यास, जुळवून घेण्‍यास आणि प्रगती करण्‍यास सक्षम करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. युनिव्‍हर्सिटीचा विश्वास आहे की, कामाचे भविष्‍य तंत्रज्ञान प्रगतीसह मानवी परिवर्तनावर देखील अवलंबून आहे. अध्‍ययनाला विज्ञानाची जोड देत प्‍लॅटफॉर्म विद्यार्थ्‍यांसाठी त्‍यांच्‍या आरामदायी क्षेत्रामधून बाहेर पडत आवश्यक नवीन कौशल्‍ये निर्माण करण्‍यास मदत करतो.

 

एआय शिक्षण सर्वांसाठी सहजसाध्य करणे

 

सर्विसनाऊ युनिव्‍हर्सिटी शिक्षणाला सर्वसमावेशक, गेमिफाइड प्रवासामध्‍ये बदलते, जे वास्‍तविक विश्वातील कौशल्‍ये निर्माण करते.

 

• मोफत, मागणीदायी कोर्सेससह मूल्‍यांकन आणि डिजिटल क्रेडेन्शियल्‍स: विकास दाखवण्‍यासाठी पॉइण्‍ट्स, बॅजेस् व रॅक मिळवा.

 

• ‘द युनिव्‍हर्सिटी ऑफ यू’च्‍या माध्‍यमातून एआय-समर्थित वैयक्तिककरण सर्वोत्तम कन्‍टेन्‍ट देते आणि यशावर देखरेख ठेवते.

 

• टेक्निकल व मानवी कौशल्‍ये कव्‍हर करणारे लहान आकाराचे अभ्‍यासक्रम, तसेच विद्यार्थ्‍यांना एआयची माहिती मिळवण्‍यास, त्‍याचा वापर करण्‍यास आणि नेतृत्‍व करण्‍यास मदत करण्‍यासाठी प्रबळ एआय मार्ग.

 

• प्रशासक, विकासम, अंमलबजावणीकर्ते, प्‍लॅटफॉर्म मालक व सेकऑप्‍ससाठी भारत-केंद्रित भूमिका मार्ग सॉफ्टवेअर डेव्‍हलपमेंट, डेटा इंजीनिअरिंग आणि वेब डेव्‍हलपमेंट यांसारख्‍या झपाट्याने विकसित होणाऱ्या करिअरशी संलग्‍न आहेत.

 

प्रभावासाठी सहयोग

 

लाँच करण्‍यात आलेल्‍या सर्विसनाऊ युनिव्‍हर्सिटीमधून कंपनीचा तिचे भारतातील ग्राहक, सहयोगी आणि शैक्षणिक परिसंस्‍थेसोबतचा दृढ सहयोग दिसून येतो. युनिव्‍हर्सिटी अकॅडेमिक करिक्‍यूलम इंटीग्रेशन प्रोग्राम सारखे उपक्रम, एआयसीटीई, राज्‍य उच्‍च शिक्षण परिषदा आणि सरकारी कौशल्‍य संस्‍था यांसारख्‍या नियामक संस्‍थांसोबतच्‍या सहयोगाच्‍या माध्‍यमातून सर्विसनाऊ एआय-समर्थित शिक्षण मोठ्या प्रमाणात उपलब्‍ध करून देत आहे आणि देशातील झपाट्याने विकसित होत असलेल्‍या रोजगार श्रेणींसोबत अभ्‍यासक्रम मार्ग संलग्‍न करत आहे.

 

सर्विसनाऊ युनिव्हर्सिटी कंपनीच्या जागतिक कौशल्य विकास उपक्रमांवर आधारित आहे, ज्यामुळे भारतातील तरुणांसाठी तंत्रज्ञान व संधी अधिक प्रमाणात उपलब्‍ध होतात. सर्विसनाऊच्या सर्वात वेगाने वाढणाऱ्या आणि सर्वात धोरणात्मक बाजारपेठांपैकी एक म्हणून भारत कंपनीच्या टॅलेंट परिवर्तन धोरणासाठी महत्त्वाचा आहे. सर्विसनाऊ युनिव्हर्सिटीच्या लाँचसह कंपनी भारतातील विद्यार्थ्यांना भविष्यासाठी सुसज्‍ज एआय कौशल्‍ये, गेमिफाइड प्रवास आणि भावी डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी स्थिर करिअर मार्गांसह सक्षम करण्‍याप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ करत आहे.

 

सर्विसनाऊ युनिव्हर्सिटी (ServiceNow University) आता भारतातील सर्व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे, ज्यामध्ये कर्मचारी, ग्राहक, भागीदार आणि व्यक्‍

तींचा समावेश आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments