गुरूग्राम, भारत – October ३, २०२५: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आज बीस्पोक एआय एअर कंडिशनर्सवर ‘गो सेव्ह टूडे’ मोहिमेची घोषणा केली, जी यंदा सणासुदीच्या काळात ग्राहकांसाठी जवळपास २१,००० रूपयांची बचत देऊ करते. जीएसटी कपात, सुधारित वॉरंटी फायदे आणि ऊर्जा बचत या तीन आधारस्तंभांवर आधारित ‘गो सेव्ह टूडे’ मोहिम यंदा सणासुदीच्या काळात ग्राहकांना अद्वितीय मूल्य देते.
‘गो सेव्ह टूडे’ मोहिमेचा भाग म्हणून ग्राहकांना प्रीमियम बीस्पोक एआय एअर कंडिशनर्सच्या खरेदीवर विशेष ५-५-५० ऑफर मिळू शकते, म्हणजेच २२ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर २०२५ या ५० दिवसांच्या कालावधीमध्ये खरेदी केल्यास विद्यमान ५ वर्षांच्या सर्वसमावेशक वॉरंटी व्यतिरिक्त ५ महिन्यांची अतिरिक्त सर्वसमावेशक वॉरंटी मिळू शकते.
बीस्पोक एआय एअर कंडिशनर ग्राहकांना जवळपास ३८०० रूपयांचा जीएसटी कपातीचा फायदा, तसेच १५०० रूपयांचे इन्स्टॉलेशन मोफत आणि जवळपास ४००० रूपयांची बँक कॅशबॅक देखील मिळेल, ज्यामुळे कुटुंबांसाठी यंदा सणासुदीचा काळ अधिक स्मार्ट, अधिक ऊर्जा-कार्यक्षम बीस्पोक एआय एसी खरेदी करण्याकरिता परिपूर्ण वेळ आहे.
बीस्पोक एआय एसी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना जवळपास १२००० रूपयांच्या ५ वर्षांच्या सर्वसमावेशक वॉरंटीव्यतिरिक्त अतिरिक्त ५ महिन्यांची वॉरंटी देखील मिळेल.
जीएसटी दर कपातीसह हे फायदे सॅमसंग एआय एअर कंडिशनर्सला अधिक सहजसाध्य बनवतात.
”आम्हाला ‘गो सेव्ह टूडे’ मोहिमेच्या माध्यमातून ग्राहकांसोबत सणासुदीचा काळ साजरा करण्याचा, तसेच आमचे प्रगत तंत्रज्ञान अधिक सहजसाध्य करण्याचा आनंद होत आहे. आमची ५-५-५० ऑफर अद्वितीय आहे, जी कुटुंबांना जीएसटी कपातीचे फायदे, विस्तारित वॉरंटी, मोफत इन्स्टॉलेशन आणि बँक कॅशबॅकसह बीस्पोक एआय एअर कंडिशनर खरेदी करण्यास प्रेरित करते. आमची बीस्पोक एआय एअर कंडिशनर श्रेणी दैनंदिन राहणीमान अधिक उत्साहित करत आहे आणि या ऑफर्स स्मार्ट, ऊर्जा-कार्यक्षम कूलिंग अधिक लाभदायी करतात,” असे सॅमसंग इंडियााच्या डिजिटल अप्लायन्सेसचे उपाध्यक्ष गुफरान आलम म्हणाले.
बीस्पोक एआय विंडफ्री एअर कंडिशनर्स आरामदायीपणा व कार्यक्षमता देण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत, तसेच शक्तिशाली कूलिंग देण्यासह वीजेचा कमी वापर करतात. ग्राहक सॅमसंग बीस्पोक एआय एअर कंडिशनर्समधील एआय एनर्जी मोडच्या माध्यमातून जवळपास ३० टक्के ऊर्जा बचत करू शकतात. विंडफ्री कूलिंग, एआय फास्ट अँड कम्फर्ट मोड, ५-स्टेप कन्वर्टिबल कूलिंग आणि क्वॉइट ऑपरेशन यांसारखी वैशिष्ट्ये या श्रेणीला आधुनिक राहणीमानासाठी अनुकूल बनवतात.
टिकाऊ रचनेसह कॉपर कंडेन्सर, स्मार्ट सोयीसुविधा जसे वाय-फाय व स्मार्टथिंग्ज अॅप कंट्रोल, लुप्त एलईडी पॅनेल डिस्प्ले, विविध कूलिंग मोड्स (टर्बो, स्लीप, डिह्युमिडिफिकेशन इत्यादी) आणि प्रगत फिल्टर तंत्रज्ञान (फ्रीज वॉश, ऑटो-क्लीन, अॅण्टी-बॅक्टेरिअल फिल्टर) खात्री देतात की, कार्यक्षमता, स्वच्छता आणि सुलभ वापर एकत्रित असतील.
ग्राहक सॅमसंग अधिकृत सहयोगी स्टोअर्स, Samsung.com आणि आघाडीच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर या उत्सवी ऑफर्सचा आनंद घेऊ शकतात. उत्सवासाठी घराला सुशोभित करायचे असो किंवा प्रियजनांना आरामदायी सुविधा द्यायच्या असोत सॅमसंग बीस्पोक एआय एअर कंडिशनर खरेदी करण्याची ही परि
पूर्ण वेळ आहे.


