पुणे, 1 ऑक्टोबर २०२५ – भारतातील सर्वाधिक विश्वासार्ह कौटुंबिक दागिन्यांचा ब्रँड असलेल्या पीएनजी ज्वेलर्सने नवरात्री २०२५ च्या निमित्ताने आपल्या विस्ताराचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठत मोशी आणि वाकड येथे दोन नवीन दालनांचे शुभारंभ केले. नेहमीप्रमाणे पीएनजी ज्वेलर्स आधुनिकतेसह आपली परंपरा आणि विश्वास जपत दागिन्यांची अप्रतिम डिझाईन्स ग्राहकांपर्यंत पोहोचणार आहे.
पिंपरी-चिंचवड परिसरातील या दोन्ही दालनांमध्ये सोने, हिरे, चांदी आणि प्लॅटिनमच्या दागिन्यांचा संपूर्ण संग्रह उपलब्ध असेल. प्रथा, गोल्डन कथा, ईना आणि सप्तम यांसारख्या वधू संग्रहासोबतच पारंपरिक व हलक्या वजनातील आधुनिक डिझाइन्स येथे पाहायला मिळतील. दालनाच्या शुभारंभानिमित्त, पीएनजी ज्वेलर्सकडून सोन्याच्या दागिन्यांवर मेकिंग चार्जेसमध्ये ५०% पर्यंत सूट, हिऱ्याच्या दागिन्यांवर मेकिंग चार्जेसमध्ये १००% पर्यंत सूट, तसेच जुन्या सोन्याच्या एक्स्चेंजवर ०% कपात* अशी आकर्षक ऑफर जाहीर करण्यात आली आहे.
मोशी येथील दालनाचे उद्घाटन अभिनेत्री सई ताम्हणकर हिच्या हस्ते करण्यात आले यावेळी ग्राहकांकडून प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच वाकड येथील दालनांचे उद्घाटन बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंग हिच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उत्साह व्यक्त करत त्या
म्हणाल्या, “पीएनजी ज्वेलर्स नेहमी आपल्या ग्राहकांना आपल्या कुटुंबाप्रमाणे जपून परंपरा कायम ठेवत आहे. पीएनजी ज्वेलर्सची निष्ठा आणि कलाकारी प्रत्येक नवीन दालनाला खास बनवते.”
पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले, “मोशी आणि वाकड येथील या नवीन दालनांमुळे पुण्यासारख्या विकसनशील शहरात आमची उपस्थिती अधिक बळकट करत आहोत. प्रत्येक पिढीच्या दागिन्यांचा विश्वासू साथीदार राहण्याचे आमचे वचन आम्ही पुन्हा अधोरेखित करत आहोत. नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर सुरू झालेला हा नवीन प्रवास आमच्यासाठी अधिक खास आहे, कारण नवरात्री हा सण म्हणजे नवीन सुरुवात, समृद्धी आणि एकत्रतेचे प्रतीक आहे, जी मूल्ये पीएनजी ज्वेलर्सच्या परंपरेशी आणि दृष्टीकोनाशी उत्तमरीत्या जुळतात.”
या नव्या दालनांच्या माध्यमातून पीएनजी ज्वेलर्सने महाराष्ट्रातील सतत बदलणाऱ्या दागिने ग्राहकवर्गामध्ये आपला विश्वास आणि परंपरा अधिक दृढ केले आहे.


