Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedपीएमआरडीए पुरस्कृत महा ओपन एटीपी चॅलेंजर 100 पुरूष आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत एकेरीत...

पीएमआरडीए पुरस्कृत महा ओपन एटीपी चॅलेंजर 100 पुरूष आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत एकेरीत रशियाच्या अलेक्सी झाखारोव्हचा मानांकित खेळाडूला पराभवाचा धक्का दुहेरीत अर्जुन कढे व जीवन नेद्दूचेझियन, साकेत मायनेनी व रामकुमार रामनाथन यांचे आव्हान संपुष्टात

पुणे, 22 फेब्रुवारी 2024: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना यांच्या वतीने व महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा विभाग यांच्या संलग्नतेने आयोजित पीएमआरडीए पुरस्कृत महा ओपन एटीपी चॅलेंजर 100 पुरूष आंतरराष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या उपांत्यपूर्व फेरीत एकेरीत रशियाच्या अलेक्सी झाखारोव्हचा मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय मिळवला. तर, दुहेरीत भारताच्या अर्जुन कढे व जीवन नेद्दुचेझियन, साकेत मायनेनी व रामकुमार रामनाथन यांचे आव्हान संपुष्टात आले.

म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या उपांत्यपूर्व फेरीत एकेरीत मोनाकोच्या चौथ्या मानांकित व्हॅलेंटिन व्हॅचेरोट याने फ्रांसच्या एन्झो कौकौडचा टायब्रेकमध्ये 7-6(2), 6-4 असा पराभव केला. हा सामना 1तास 29मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखत जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले. बाराव्या गेमपर्यंत 6-6 अशी बरोबरी झाल्याने हा सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये व्हॅलेंटिनने आपल्या बिनतोड सर्व्हिस व आक्रमक खेळाच्या जोरावर एन्झोची सातव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व हा सेट 7-6(2) असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये व्हॅलेंटिनने एन्झोची तिसऱ्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक करून आघाडी मिळवली. पण पुढच्याच गेममध्ये एन्झोने व्हॅलेंटिनची सर्व्हिस रोखली व बरोबरी साधली. पण व्हॅलेंटिनने पुन्हा एकदा आक्रमक व वेगवान खेळ करत सातव्या गेममध्ये एन्झोची सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-4 असा जिंकून सामन्यात विजय मिळवला.

रशियाच्या अलेक्सी झाखारोव्ह याने क्रोएशियाच्या दुसऱ्या मानांकित दुजे अजदुकोविकचा 6-4, 6-3 असा पराभव करून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. हा सामना 1 तास 21 मिनिटे चालला. भारताच्या वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या मुकुंद ससीकुमारची तब्बेत बिघडल्यामुळे त्याने या स्पर्धेतून माघार घेतली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या ॲडम वॉल्टन याला पुढे चाल देण्यात आली.

पुणे मेट्रोपोलिटन रिजनल डेव्हलमेंट ऑथोरीटी (पीएमआरडीए) यांनी प्रायोजित ही स्पर्धा भारतातील एटीपी चॅलेंजर मालिकेतील तिसरी स्पर्धा आहे. यापूर्वीच्या दोन स्पर्धा बंगळुरू आणि चेन्नई येथे पार पडल्या आहेत.

दुहेरीत उपांत्य फेरीत फ्रांसच्या डॅन ॲडेड व कोरियाच्या युन सेओंग चुंग या तिसऱ्या मानांकित जोडीने भारताच्या अर्जुन कढे व जीवन नेद्दुचेझियन या अव्वल मानांकित जोडीचा 6-3, 6-4 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. ऑस्ट्रेलियाच्या ॲडम वॉल्टनने ट्रिस्टन स्कूलकेटच्या साथीत भारताच्या साकेत मायनेनी व रामकुमार रामनाथन यांचा 7-6(6), 6-2 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.

निकाल: मुख्य ड्रॉ: उपांत्यपूर्व फेरी:
व्हॅलेंटिन व्हॅचेरोट(मॉन) [4] वि.वि. एन्झो कौकौड (फ्रांस) 7-6(2), 6-4;
ॲडम वॉल्टन(ऑस्ट्रेलिया) [3]पुढे चाल वि.मुकुंद ससीकुमार(भारत)वि.वि.
निकी कलियांदा पोनाचा(भारत)वि.वि.डॅनी स्विनी (ऑस्ट्रेलिया) [7]वि.वि.
अलेक्सी झाखारोव्ह(रशिया) वि.वि. दुजे अजदुकोविक (क्रोएशिया)(2)6-4, 6-3;

दुहेरी गट: उपांत्य फेरी:
डॅन ॲडेड (फ्रांस)/युन सेओंग चुंग (कोरिया)[3] वि.वि. अर्जुन कढे(भारत)/जीवन नेद्दुचेझियन(भारत)[1]6-3, 6-4;
ॲडम वॉल्टन(ऑस्ट्रेलिया) /ट्रिस्टन स्कूलकेट(ऑस्ट्रेलिया)वि.वि.साकेत मायनेनी(भारत)/रामकुमार रामनाथन (भारत) 7-6(6), 6-2.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments