Saturday, August 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedपश्चिम भारतात झिग्लीचा विस्तार, पुण्यात पहिलेच पाळीव प्राणी संगोपन केंद्र सुरू केले

पश्चिम भारतात झिग्लीचा विस्तार, पुण्यात पहिलेच पाळीव प्राणी संगोपन केंद्र सुरू केले

पुणे, 01 नोव्हेंबर 2025: भारतातील पहिला तंत्रज्ञान-सक्षम ओम्निचॅनेल – पाळीव प्राण्यांची काळजी घेणारा ब्रँड, झिग्लीने (कॉस्मो फर्स्ट लिमिटेड) महाराष्ट्रातील पुण्यात प्रथमच पाळीव प्राण्यांसाठी संगोपन केंद्र सुरू करत आपला विस्तार केला आहे. शहरातील पाळीव प्राण्यांच्या पालकांसाठी झिग्लीची विश्वासार्ह, पाळीव प्राण्यांची संपूर्णपणे काळजी घेणारी यंत्रणा आणत असताना, हा टप्पा संपूर्ण भारतातील झिग्लीच्या वाढत्या उपस्थितीचे प्रतीक आहे.

 

 

 

दुकान क्रमांक 5, व्हीटीपी सेलेस्टा, एनआयबीएम ऍनेक्स, विबग्योर स्कूल रोड, मोहम्मद वाडी येथे स्थित पुण्यातील हे केंद्र पूर्णपणे झिग्लीचा अनुभव देण्याच्या दृष्टीने डिझाइन केलेले आहे – पाळीव प्राण्यांची सर्वसमावेशक काळजी, प्रीमियम पाळीव प्राणी स्पा आणि ग्रूमिंग सेवा, पाळीव प्राण्यांसाठी आवश्यक वस्तू आणि कुत्रे, मांजरी आणि लहान पाळीव प्राण्यांसाठी उच्च-गुणवत्तेच्या उत्पादने, अशा साऱ्याच गोष्टी येथे उपलब्ध होणार आहेत. हे सेंटर लवकरच 24×7 पशुवैद्यकीय सेवेची देखील सोय करेल, ज्यामुळे पाळीव प्राण्यांच्या आरोग्यसेवेसाठी झिग्लीची वचनबद्धता अधिक मजबूत होईल.

 

 

 

या पाळीव प्राण्यांच्या नवीन संगोपन केंद्राच्या लाँचबद्दल कॉस्मो फर्स्टचे ग्रुप सीईओ श्री. पंकज पोद्दार म्हणाले, “पुणे हे एक गतिमान आणि वाढत्या पाळीव प्राण्यांच्या पालक समुदायाचे प्रतिनिधित्व करते. ही परिस्थिती झिग्लीच्या जबाबदार आणि आनंदी पाळीव प्राण्यांच्या तत्त्वज्ञानाशी खरोखर जुळते. आमच्या विस्तारासह महाराष्ट्रात आम्ही केवळ एक नवीन केंद्र सुरू करत नाही – तर आम्ही तंत्रज्ञान, सहानुभूती आणि कौशल्याने प्रेरित जागतिक दर्जाचे पाळीव प्राणी संगोपन ग्राहकांच्या घराच्या अगदी जवळ आणत आहोत. दर्जेदार पाळीव प्राण्यांची काळजी घेणे हा संपूर्ण भारतात जीवनशैलीचा भाग बनवणे हे आमचे ध्येय आहे.”

 

 

 

झिग्लीच्या या नवीन केंद्रात पाळीव प्राण्यांची नियमित तपासणी केली जाईल. तसेच आजारांचे योग्य निदान करण्यापासून ते स्पा उपचार आणि योग्य सल्ले, अशी सर्वोत्तम काळजी मिळावी यासाठी उत्तम पशुवैद्यकीय तज्ज्ञ आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची एक इन-हाऊस टीम असेल. याव्यतिरिक्त, झिग्लीचे प्रायव्हेट लेबल असलेल्या अ‍ॅपलॉड, फर प्रो आणि झिग्ली लाईफस्टाइलची उत्पादने देखील या केंद्रात उपलब्ध असतील. या लाँचसह, झिग्लीने भारतातील सर्वात विश्वासार्ह पाळीव प्राण्यांची काळजी घेणारा ब्रँड म्हणून आपले स्थान आणखी मजबूत केले आहे.

 

 

 

भारतातील पाळीव प्राण्यांशी संबंधित व्यवसायात मोठी वाढ होत आहे आणि 20% च्या सीएजीआरने 2032 पर्यंत तो 2.1 ट्रिलियन रुपये (यूएस $25.03 अब्ज) पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. हे प्रामुख्याने खर्च करण्याची वाढती क्षमता आणि मिलेनियल्स तसेच जेन-झेडमध्ये वाढत असलेली पाळीव प्राण्यांची आवड – जे पाळीव प्राण्यांना कुटुंबातीलच एक सदस्य म्हणून पाहतात, यामुळे होते आहे. प्राण्यांना पाळणे अधिक सोपे होण्यासोबतच आवड जपणारा एंड-टू-एंड पाळीव प्राण्यांच्या काळजीचा अनुभव देऊन या परिवर्तनाचे नेतृत्व करण्याचे झिग्लीचे उद्दिष्ट आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments