Saturday, August 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedमेगा जीपीकॉन २०२५’पूर्व कार्यशाळेत पाठीचा कणा आणि लठ्ठपणावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन जनरल प्रॅक्टिशनर्स...

मेगा जीपीकॉन २०२५’पूर्व कार्यशाळेत पाठीचा कणा आणि लठ्ठपणावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे आयोजन : डॉक्टर्स आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांचा सहभाग

पुणे : ‘मेगा जीपीकॉन २०२५’ या वैद्यकीय परिषदेअंतर्गत आयोजित दोन पूर्व कार्यशाळा उत्साहात पार पडल्या. गणेश सभागृह, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे येथे झालेल्या या कार्यशाळांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांनी पाठीचा कणा आणि लठ्ठपणाशी संबंधित समस्यांवर सखोल मार्गदर्शन केले.

 

जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन तर्फे होणाऱ्या वैद्यकीय परिषदेच्या पार्श्वभूमीवर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मेगाजिपिकॉन चेअरमन डॉ. सुनील भुजबळ, उप चेअरमन डॉ. आप्पासाहेब काकडे, तसेच सचिव डॉ. भाग्यश्री मुनोत-मेहता, डॉ. राजेश दोशी व खजिनदार डॉ. संदीप निकम यावेळी उपस्थित होते. वैज्ञानिक समितीचे अध्यक्ष डॉ. प्रविण दरक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

पहिली कार्यशाळा ‘ऑल अबाउट स्पाईन’ या विषयावर झाली. कार्यशाळा अध्यक्ष डॉ. संतोष गोसावी, उपाध्यक्ष डॉ. स्मिता डोंगरे आणि डॉ. नवीन डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांनी पाठीच्या कण्याशी संबंधित आजार, कारणे व उपचारपद्धतींवर विवेचन केले.,डॉ. राजेश पारसनीस यांनी सामान्य पाठीच्या वेदनांचे कारणे व उपचार या विषयावर, तर डॉ. जिनेश परमार यांनी प्रोलॅप्स डिस्क व रॅडिक्युलोपथी याविषयी माहिती दिली. डॉ. सचिन पाठक यांनी स्पॉन्डायलोसिस, लिस्थेसिस आणि स्टेनोसिस यावर तर डॉ. इंगळे यांनी स्थितीतील दोष, सुधारणा आणि पाठीसाठी व्यायामाचे प्रात्यक्षिक सादर केले.

 

दुसरी कार्यशाळा ‘ओबेसिटी थ्री सिक्सटी डिग्री अप्रोच’ या विषयावर पार पडली. कार्यशाळा अध्यक्ष डॉ. रूपा अगरवाल, उपाध्यक्ष डॉ. नितीन निम्बाणे व डॉ. शर्मिला शिंदे- बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली या सत्रात लठ्ठपणाच्या समस्येवर विविध पैलूने चर्चा झाली. डॉ. नितीन पाटील यांनी विनिंग द वेट बॅटल, आहारतज्ञ गीतांजली बोरसे यांनी वेट लॉस डाएट मिथ्स अँड फॅक्ट्स, डॉ. केदार पाटील यांनी नवीन वजन कमी करण्याचे पर्याय तर सुप्रसिद्ध डॉ. अमित द्राविड यांनी ओबेसिटी अँड इन्फेक्शन या विषयांवर आपले विचार मांडले.

 

या दोन्ही कार्यशाळांना डॉक्टरांचा लोणंद, शिरवळ, मंडणगड व नाशिक येथून डॉक्टरांचा प्रतिसाद मिळाला. सहभागी डाॅक्टरांच्या शंकांचे निरसन करत तज्ज्ञांनी व्यावहारिक उदाहरणांसह मार्गदर्शन केले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments