Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedशालेय विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक सौहार्दाची, परस्पर आदराची आणि माणुसकीची मूल्ये रुजवणाऱ्या 'सलोखा उपक्रमाला...

शालेय विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक सौहार्दाची, परस्पर आदराची आणि माणुसकीची मूल्ये रुजवणाऱ्या ‘सलोखा उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

पुणे, दि. १ डिसेंबर, २०२५ : शालेय विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक सौहार्दाची, परस्पर आदराची आणि माणुसकीची मूल्ये रुजावीत या उद्देशाने पुण्यातील रोटरी क्लब ऑफ पुणे- लोकमान्यनगरने नुकत्याच आयोजित केलेल्या ‘सलोखा’ या अनोख्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 

या उपक्रमा अंतर्गत विविध शाळांमधील विविध धर्माच्या शालेय विद्यार्थ्यांनी मंदिर, मशीद, चर्च आणि गुरुद्वारा या विविध धर्माच्या पवित्र स्थळांना भेट दिली आणि प्रत्येक धर्माची वैशिष्ट्ये व मूल्ये समजावून घेतली. या भेटीमुळे विद्यार्थ्यांच्या मनात विविधतेविषयी आदर वाढला आणि ‘एकता’ हा संदेश प्रभावीपणे पोहोचला.

 

या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्यनगरचे डॉ. सिद्धार्थ मेहता म्हणाले, “सलोखा या कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला असून शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. अनेकांनी अशा प्रकारचे उपक्रम मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. रोटरी क्लब ऑफ लोकमान्यनगरच्या या प्रयत्नामुळे विद्यार्थ्यांच्या मनात सौहार्द, सहिष्णुता आणि एकजुटीची बीजं अधिक दृढ झाली.”

 

‘सलोखा’ उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल रोटरी क्लबच्या वतीने अध्यक्ष ऋषिकेश बागडे यांनी सर्व सहभागी विद्यार्थी, शिक्षक आणि स्वयंसेवकांचे आभार मानले असून पुढील काळातही अशा अर्थपूर्ण उपक्रमांची मालिका राबवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

 

कळत्या वयात जर शालेय विद्यार्थ्यांना दुसऱ्या धर्माचा आदर करण्याची शिकवण दिली तर भविष्यामध्ये त्यांच्या वागण्यामध्ये त्यांचा दुसऱ्याच्या धर्माकडे बघण्याचा दृष्टिकोनामध्ये कमालीचा फरक जाणवतो असा आपला अनुभव असल्याचे या कल्पक कार्यक्रमाचे नियोजन करणाऱ्या महेश घोरपडे यांनी आवर्जून नमूद केले. पुढील वर्षी हा उपक्रम फक्त काही विद्यार्थी यांच्या पुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण शाळेसाठी करण्याचा निर्धार देखील घोरपडे यांनी व्यक्त के

ला.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments