Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedअर्घ्य ' अर्पण करून सवाई ची स्वरमय सांगता गुरूपरंपरेला अर्पण केले...

अर्घ्य ‘ अर्पण करून सवाई ची स्वरमय सांगता गुरूपरंपरेला अर्पण केले ‘अर्घ्य’

पुणे, दि. १४ डिसेंबर, २०२५ :किराणा घराण्याचे उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब, त्यांचे शिष्य सवाई गंधर्व आणि त्यांचे शिष्य पं. भीमसेन जोशी या महान गुरुपरंपरेला अभिवादन म्हणून भीमसेनजींचे शिष्य पं. उपेंद्र भट, श्रीनिवास जोशी, आनंद भाटे आणि विराज जोशी यांनी गुरुंच्या रचनांचे गायन करत स्वरांचे ‘अर्घ्य’ अर्पण केले. यावेळी भरत कामत (तबला), अविनाश दिघे (हार्मोनियम), वैशाली कुबेर, अनुजा भावे -क्षीरसागर, संदीप जाधव व धनंजय भाटे (तानपुरा) माऊली टाकळकर (टाळ) यांनी साथ केली. प्रतिवर्षाप्रमाणे सवाई गंधर्व यांच्या भैरवी ध्वनिमुद्रिकेने ७१ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा समारोप झाला.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments