Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedप्रशांत हरसुले यांच्या लोकसेवा कार्यालयाचे उद्घाटन

प्रशांत हरसुले यांच्या लोकसेवा कार्यालयाचे उद्घाटन

पुणे : भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष व कोथरूड मतदारसंघाचे अध्यक्ष प्रशांत हरसुले यांच्या लोकसेवा कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच कोथरूडचे आमदार मा. चंद्रकांत पाटील व केंद्रीय राज्यमंत्री नामदार मुरलीधर मोहोळ यांच्या सौभाग्यवती मोनिकाताई मोहोळ यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.

 

या प्रसंगी मार्गदर्शन करताना मा. चंद्रकांत पाटील म्हणाले की, लोकसेवा कार्यालय हे केवळ राजकीय कार्याचे केंद्र नसून नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्याचे प्रभावी माध्यम ठरते. कोथरूड परिसरातील नागरिकांना विविध शासकीय योजना, विकासकामे तसेच दैनंदिन अडचणींवर तत्काळ मदत मिळावी, यासाठी अशा कार्यालयांची महत्त्वाची भूमिका आहे. प्रशांत हरसुले हे नेहमीच सर्वसामान्य नागरिकांच्या संपर्कात राहून काम करतात, त्यामुळे हे लोकसेवा कार्यालय नागरिकांसाठी विश्वासाचे केंद्र बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

प्रशांत हरसुले यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, या लोकसेवा कार्यालयाच्या माध्यमातून कोथरूड मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या, तक्रारी आणि सूचना थेट ऐकून घेऊन त्यावर त्वरित कार्यवाही करण्यात येईल. केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविणे, तसेच परिसरातील विकासकामांना गती देणे हा या कार्यालयाचा मुख्य उद्देश आहे. पक्षाने दिलेल्या जबाबदारीला न्याय देत संघटन मजबूत करण्यासाठी व नागरिकांसाठी सदैव उपलब्ध राहण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

 

या उद्घाटन सोहळ्यास शशिकलाताई मेंगडे, शिवराम मेंगडे,जयंत भावे,मंजुश्री खर्डेकर, संदीप बुटाला, दीपक पोटे, कुलदीप सावळेकर, निलेश कोंढाळकर, प्राची बगाटे, कांचन कुंबरे, माधुरी सहस्त्रबुद्धे तसेच परिसरातील नागरिक, भाजपा पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

उद्घाटन सोहळ्यानंतर उपस्थित मान्यवरांनी लोकसेवा कार्यालयाची पाहणी केली. या वेळी परिसरातील नागरिकांनी आपल्या अपेक्षा व समस्या मांडल्या. कार्यक्रमात भाजपा शहर व मंडळ स्तरावरील पदाधिकारी, माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, महिला व युवा कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती. उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments