दशकांपासून पर्यावरणीय स्थिरतेकडे दुर्लक्ष करण्यासोबत त्याबाबतीत तडजोड केली जात आहे. आयआयटी दिल्लीसोबत सहयोगाने आयोजित करण्यात आलेला सॅमसंगचा प्रमुख शैक्षणिक उपक्रम सॅमसंग सॉल्व्ह फॉर टूमारो (एसएफटी) २०२५ मधील पाठिंबा व मार्गदर्शनासह तरूण नवप्रवर्तकांनी उत्तम उदाहरण सादर केले, ते म्हणजे तंत्रज्ञान पर्यावरणाचे संरक्षण करण्यासोबत समृद्धतेला चालना देऊ शकते. भारतभरातील हजारो विद्यार्थ्यांनी थीम ‘तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पर्यावरणीय स्थिरता’अंतर्गत अत्याधुनिक सोल्यूशन्स डिझाइन केले, जेथे संसाधनांचे जतन, कचरा व्यवस्थापन, शुद्ध पिण्याचे पाणी आणि कार्बनच्या प्रमाणात कपात यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.
या नवीन पिढीतील धोरणकर्त्यांनी संपादित केलेले यश पुढीलप्रमाणे:
१. तत्परता व विकासामध्ये सामावलेली नाविन्यता
विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान डिझाइन केले, जे पाणी, ऊर्जा, जैवविविधतेचे संवर्धन करण्यासोबत कचऱ्याचे व्यवस्थापन करते, ज्यासह आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी शाश्वतता उत्प्रेरक ठरली.
२. थीम विजेता पृथ्वी रक्षक: कचऱ्याचे मालमत्तेमध्ये रूपांतरण
सॅमसंग सॉल्व्ह फॉर टूमारो २०२५ मधील लक्षवेधक विजेते पृथ्वी रक्षक मॉड्युलर एआय-समर्थित गांडूळ खत यंत्रणा आहे, जी तीन किशोरवयीन अभिषेक धांडा, प्रभकिरत सिंग आणि रचिता चंदोक यांनी डिझाइन केली आहे. त्यांची नाविन्यता स्मार्ट सेन्सरच्या माध्यमातून स्वयंचलितपणे सेंद्रिय कचऱ्याचे पोषक घटक असलेल्या कंपोस्टमध्ये रूपांतर करते, ज्यामुळे शाळा, बाजारपेठा व समुदायांसाठी उपयुक्त आहे.
३. पर्यावरणीय समस्यांना आव्हान देणाऱ्या इतर आघाडीच्या नाविन्यता
इतर टॉप टीम्सनी महत्त्वपूर्ण पर्यावरणीय समस्यांचे निराकरण केले:
ड्रॉप ऑफ होप (उत्तर प्रदेश): डिवाईस, जे सौर वातावरण संघननाचा वापर करत हवेतील वाफेचे पाण्यामध्ये रूपांतर करते.
रिन्यूएबल डिसेलिनेशन (आसाम): कमी खर्चिक व ऊर्जा कार्यक्षम विलगीकरण यंत्रणा, जी शुद्ध पिण्याचे पाणी देते
स्मॉलब्लू (गुजरात): एआय प्लॅटफॉर्म, जो एंटरप्राइज डेटा इन्फ्राला सानुकूल करतो आणि क्लाऊड पायाभूत सुविधेमध्ये कार्बनचे प्रमाण कमी करतो.
वोक्समॅप्स (मध्यप्रदेश): लिडार (LiDAR) व एचडी इमेजिंग सेन्सर्स माऊंटेड ड्रोन्स, जे प्रदूषणाबाबत डेटा गोळा करतात आणि वोक्सल मॅप्स तयार करतात.
४. प्रभाव वाढवण्यासाठी पाठिंबा
विजेत्यांना आयआयटी दिल्लीमध्ये जवळपास १ कोटी रूपये इन्क्यूबेशन सपोर्ट मिळाला, तसेच टॉप टीम्सना अतिरिक्त पुरस्कार मिळाले, जसे १ लाख रूपये अनुदान, गुडविल अवॉर्ड्स आणि यंग इनोव्हेटर अवॉर्ड्स. टॉप २० टीम्सना सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप स्मार्टफोन देण्यात आले.
५. विकेंद्रिकृत नाविन्यता परिसंस्थेचा विकास
२०२५ एडिशनमध्ये द्वितीय व तृतीय श्रेणीच्या शहरांमधून मोठ्या प्रमाणात सहभागी दिसण्यात आले, तसेच माजी विद्यार्थ्यांनी नवोदितांना मार्गदर्शन केले आणि प्रोटोटाइपिंगसाठी आयआयटी दिल्लीची एफआयटीटी लॅब्स उपलब्ध करून देण्यात आली. यामधून महानगरांपलीकडे एसटीईएम नाविन्यतेचा प्रसार दिसून येतो.
६. सहानुभूती-केंद्रित व जबाबदारपूर्ण नाविन्यता
विद्यार्थ्यांना डिझाइन-थिकिंग वर्कशॉप्सच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले, जेथे जबाबदारीने वास्तविक विश्वातील समस्यांचे निराकरण करण्यावर, सामाजिक प्रभाव व शाश्वत एआय सोल्यूशन्सना प्राधान्य देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.
७. परिवर्तन घडवून आणण्याचा वारसा
२०१० पासून सॅमसंग सॉल्व्ह फॉर टूमारोने ६८ शहरांमधील २.९ दशलक्ष तरूण नवप्रवर्तकांना प्रेरित केले आहे, विद्यार्थ्यााना प्रभावी एसटीईएम सोल्यूशन्स डिझाइन करण्यासाठी मार्गदर्शन व टूल्ससह सक्षम करत आहे. भारताचे विविध क्षेत्रांप्र
ती योगदान दरवर्षाला वाढत आहे.


