वी’ची नियोसोबत झालेली नवीन भागीदारी ‘वी’च्या सध्याच्या विस्तृत ट्रॅव्हल पोर्टफोलिओला अधिक बळकट करते. या पोर्टफोलिओमध्ये ‘ट्रूली अनलिमिटेड’ आंतरराष्ट्रीय रोमिंग पॅक्स, एकत्र प्रवास करणाऱ्या कुटुंबांसाठी विशेष सवलतीचे आयआर पॅक्स, विमानतळ लाउंज ऍक्सेस, प्रवास विमा आणि बॅगेज प्रोटेक्शन यांसारख्या अनेक सुविधांचा समावेश आहे.
अग्रणी टेलिकॉम ऑपरेटर ‘वी’ने ट्रॅव्हल बँकिंग फिनटेक ‘नियो’ सोबत भागीदारी केली असून, या सुट्ट्यांच्या हंगामात परदेशात जाणाऱ्या ग्राहकांना ‘झिरो मार्कअप फॉरेक्स कार्ड’ घरपोच मिळणार आहे. टेलिकॉम क्षेत्रातील अशा प्रकारची ही पहिलीच भागीदारी असून, सुट्टीसाठी, व्यवसायासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या ‘वी’ ग्राहकांना हे ‘नियो झिरो फॉरेक्स मार्कअप कार्ड’ अवघ्या २४ तासांत त्यांच्या दारात उपलब्ध करून दिले जाईल.
नियोसोबतच्या या भागीदारीमुळे, ‘वी’ आपल्या ट्रॅव्हल इकोसिस्टममध्ये आर्थिक सोयीचा एक भक्कम स्तर जोडत आहे. ‘वी’ ग्राहक आता ‘वी’ ऍपवरून ‘झिरो मार्क-अप नियो फॉरेक्स कार्ड’साठी विनंती करू शकतात. नियोचे प्रतिनिधी ‘वी’ ग्राहकांना केवायसी पडताळणी, कार्ड सेटअप आणि प्रायोगिक व्यवहारासाठी (trial transaction) मदत करतील. आपले क्षेत्र ‘नियो एक्स्प्रेस’ सेवेमध्ये येते की नाही, हे तपासण्यासाठी ग्राहक त्यांचे नाव आणि पिन कोड टाकू शकतात. जे ग्राहक एक्सप्रेस सेवेच्या कक्षेबाहेर आहेत, ते नियो ऍप डाऊनलोड करून आपले कार्ड डिजिटल पद्धतीने सक्रिय करू शकतात.
‘वी’ ग्राहकांसाठी एक विशेष प्रांरभिक ऑफर म्हणून, नियो त्यांची प्रमुख ‘नियो प्रीमियम’ सेवा (ज्याची किंमत ₹९९९/वर्ष आहे) पूर्णपणे मोफत देत आहे. या सेवेद्वारे प्रवाशांना अनेक लाभ मिळतील, जसे की:
● प्रवासाशी संबंधित खर्चावर वर्षभरात १०,००० रुपयांपर्यंतची मोठी बचत.
● नियो ॲपद्वारे व्हिसा आणि विमानाचे तिकीट बुक केल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क (Convenience Fee) आकारले जाणार नाही.
● नियो ॲपवरून इंटरनॅशनल हॉटेल बुकिंगवर थेट १०% डिस्काउंट.
● दर तीन महिन्याला एकदा विमानतळ लाउंजचा मोफत आनंद घेता येईल.
● प्रत्येक तिमाहीला १ मोफत एटीएम विड्रॉल
१८० हून अधिक देशांमध्ये स्वीकारले जाणारे ‘नियो फॉरेक्स कार्ड’ आंतरराष्ट्रीय व्यवहार बेस एक्सचेंज रेटवर (मूळ विनिमय दरावर) पूर्ण करते. यामुळे ग्राहकांना सहसा आकारल्या जाणाऱ्या ३ ते ५ टक्के फॉरेक्स मार्क-अप शुल्काची बचत होते, जे परदेशातील खर्चात मोठी वाढ करत असते.
हा नवीन उपक्रम आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या फायद्यासाठी उद्योगातील प्रथम श्रेणीच्या सेवा देऊन आपली ‘इंटरनॅशनल रोमिंग’ सेवा अधिक बळकट करण्याच्या ‘वी’च्या ध्येयाशी सुसंगत आहे. अलीकडेच ‘वी’ने ‘वी फॅमिली पोस्टपेड’ प्लॅनवरील सेकंडरी सदस्यांसाठी विशेष रोमिंग सवलती जाहीर केल्या होत्या, ज्याअंतर्गत दुय्यम सदस्यांना १० टक्के आणि ‘REDX फॅमिली’ वापरकर्त्यांना आयआर पॅक्सवर २५ टक्के सवलत मिळते. याशिवाय, ‘वी’ने आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्सशी भागीदारी करून सर्व आयआर पॅक्ससोबत अवघ्या २८५ रुपयांत ४० लाख रुपयांचे ट्रॅव्हल इन्शुरन्स कव्हर उपलब्ध करून दिले आहे. तसेच, ‘ब्लू रिबन बॅग्स’ सोबतच्या भागीदारीमुळे प्रवाशांना विलंब झालेल्या किंवा हरवलेल्या सामानासाठी संरक्षणासह प्रति बॅग १९,८०० रुपयांपर्यंतची भरपाई मिळते, तीही केवळ ९९ रुपयांमध्ये.
नव्याने सादर केलेल्या ‘नियो फॉरेक्स कार्ड’मुळे, ‘वी’ने आपल्या ग्राहकांसाठी एक सर्वसमावेशक आणि सोयीस्कर आंतरराष्ट्रीय प्रवासाचा अनुभव तयार केला आहे. यात अखंड कनेक्टिव्हिटी, अधिक स्मार्ट खर्च आणि देशाच्या सीमा ओलांडल्यापासून ते परत येईपर्यंतच्या प्रवासात विश्वसनीय सुरक्षेचा एक परिपूर्ण संगम साधला आहे.


