Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedनिवडणूक खर्च व्यवस्थापन कक्ष स्थापन,

निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्ष स्थापन,

पिंपरी, दि. २२ डिसेंबर २०२५ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीस दि. १५-१२-२०२५ रोजी सुरूवात झाली आहे. या निवडणुकांकरीता मध्यवर्ती निवडणुक खर्च व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य निवडणुक आयोगाकडील दि. १५-०२-२०२४ रोजीच्या आदेशान्वये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उमेदवारांनी निवडणुक खर्चाचा हिशोब सादर करणे तसेच तद्नुषंगिक कार्यवाही करण्याची कार्यपध्दती निश्चित करण्यात आलेली आहे. सदर कार्यपध्दतीनुसार निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांनी निवडणुक खर्च स्वतंत्र बैंक खात्यातून करणे आवश्यक असल्याच्या सुचना राज्य निवडणुक आयोगामार्फत देण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे उमेदवारांना प्राप्त होणारा निधी देणगी बाबतच्या तपशीलाची (स्वनिधी, पक्ष निधी, भेट, कर्ज इ.) माहिती नमुना क्र. १ व उमेदवाराने केलेल्या खर्चाच्या तपशीलाची माहिती नमुना क्र. २ मध्ये निवडणुक निकाल लागल्यापासून ३० दिवसांच्या आत नमुना क्र. ३ मधील प्रतिज्ञापत्रासह सादर करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या निवडणुक खर्च व्यवस्थापन कक्षामार्फत निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांकडून निवडणुक प्रचाराकरीता सर्वसाधारणपणे वापरल्या जाणाऱ्या प्रचार साहित्य / बाबींकरीता प्रचलित स्थानिक दरांच्या अनुषंगाने दरसूची देखील तयार करण्यात आलेली आहे.

महापालिकेमार्फत तयार करणेत आलेली दरसूची तसेच नमुना क्र. १ व २ ची पुस्तिका सर्व संबंधित उमेदवारांना त्यांचे नामनिर्देशन झालेनंतर तात्काळ निवडणुक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयामार्फत उपलब्ध करुन देण्यात येईल. त्याचप्रमाणे निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांनी निवडणुक खर्चाचे अनुषंगाने सादर करावयाच्या लेख्यांकरीता निवडणुक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयामध्ये स्वतंत्र अधिकारी / कर्मचारी यांची नियुक्ती करणेत आलेली असून त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देखील देणेत आलेले आहे. उमेदवारांमार्फत तयार करावयाच्या निवडणुक लेख्यांकरीता (नमुना क्र. १ व २) संबंधित अधिकारी / कर्मचारी यांचेकडे देखील उमेदवरांना आवश्यकतेनुसार मार्गदर्शन घेता येईल, अशी व्यवस्था करणेत आलेली आहे.

 

मु

ख्य

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments