पुणे, २३ डिसेंबर २०२५: साऊथ आफ्रिकन टूरिझमने आपला प्रमुख कॉर्पोरेट सहभाग उपक्रम ‘कॉर्पोरेट थिंक टँक’ चे पाचवे पर्व सुरू ठेवत पुण्यात नुकतेच या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले.यामध्ये २५ हून अधिक कॉर्पोरेट नेतृत्वाने सहभाग घेतला, जेथे त्यांना संकल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी आणि सहयोगाकरिता नवीन मार्गांचा शोध घेण्यासाठी अद्वितीय संधी मिळाली.
चार शहरांमधील सिरीजचा भाग म्हणून हा उपक्रम साऊथ आफ्रिकन टूरिझम आणि भारतातील कॉर्पोरेट क्षेत्रादरम्यान दृढ संबंध निर्माण करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. विचारशील चर्चासत्रे, सर्वोत्तम पर्यटन स्थळांचे प्रदर्शन आणि परस्परसंवादात्मक नेटवर्किंग सत्रांच्या माध्यमातून ‘कॉर्पोरेट थिंक टँक’ व्यवसाय इव्हेण्ट्स, माइस (MICE) आणि विश्रांतीसाठी केल्या जाणाऱ्या प्रवासासाठी प्रमुख गंतव्य म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या वाढत्या लोकप्रियतेला प्रकाशझोतात आणण्यासाठी धोरणात्मक प्लॅटफॉर्म आहे.
पुणे साऊथ आफ्रिकन टूरिझमसाठी धोरणात्मक केंद्रित बाजारपेठ म्हणून उदयास आली आहे, ज्याला पुण्यातील आयटी, ऑटोमोटिव्ह, उत्पादन व शैक्षणिक क्षेत्रांमधील प्रबळ उपस्थितीचे, तसेच वाढत्या कॉर्पोरेट व तरूण व्यावसायिक पर्यटक वर्गाचे पाठबळ आहे. देशाबाहेर प्रवासासाठी वाढती मागणी आणि प्रवास, कॉन्फरन्सेस आणि विश्रांतीकरिता उत्साहवर्धक हॉलिडेप्रती वाढत्या रूचीसह साऊथ आफ्रिकन टूरिझमने पुणे शहराला दक्षिण आफ्रिकेमधील माइस व लिजर प्रवासासाठी उच्च क्षमता असलेली स्रोत बाजारपेठ म्हणून धोरणात्मकरित्या स्थित केले आहे.
”कॉर्पोरेट थिंक टँक आमच्याकरिता प्रत्यक्ष भारतातील कॉर्पोरेट प्रमुखांशी संलग्न होण्यासाठी आणि त्यांच्या सर्वसमावेशक प्रवास प्राधान्यक्रमांबाबत सखोल माहिती जाणून घेण्यासाठी धोरणात्मक प्लॅटफॉर्म आहे,” असे साऊथ आफ्रिकन टूरिझमचे आशिया, ऑस्ट्रेलिया व मध्य पूर्वमधील प्रादेशिक महाव्यवस्थापक श्री. गकोबनी मॅनकोटीवा म्हणाले. ”आम्हाला पुण्यामध्ये हा उपक्रम राबवण्याचा आनंद होत आहे. पुणे शहर आयटी, उत्पादन, ऑटोमोटिव्ह आणि उदयोन्मुख नाविन्यता-केंद्रित उद्योगांमधील प्रबळ उपस्थितीसाठी ओळखले जाते. येथे करण्यात आलेल्या चर्चा माहितीपूर्ण व दूरगामी आहेत, ज्यामधून दक्षिण आफ्रिकेमधील माइस विभागासाठी स्रोत बाजारपेठ म्हणून पुण्याचे वाढते महत्त्व अधिक दृढ होत आहे. भारत आमच्या झपाट्याने विकसित होत असलेल्या बाजारपेठांपैकी एक असण्यासह आम्ही अर्थपूर्ण कॉर्पोरेट सहयोग निर्माण करण्याप्रती, तसेच पुण्यापासून दक्षिण आफ्रिकेपर्यंत अनेक व्यवसाय इव्हेण्ट्स व इन्सेंटिव्ह ग्रुप्सचे स्वागत करण्याप्रती कटिबद्ध आहोत.”
—


