Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedपीएमडीटीए मानांकन एसेस स्पोर्ट्स अरेना ब्रॉन्झ सिरिज 2024 स्पर्धेत 131 खेळाडूंचा सहभाग

पीएमडीटीए मानांकन एसेस स्पोर्ट्स अरेना ब्रॉन्झ सिरिज 2024 स्पर्धेत 131 खेळाडूंचा सहभाग

पुणे, 1 मार्च 2024: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे पीएमडीटीए मानांकन एसेस स्पोर्ट्स अरेना ब्रॉन्झ सिरिज 2024स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 8 व 10 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील ही स्पर्धा 2 ते 4 मार्च 2024 या कालावधीत एसेस स्पोर्ट्स अरेना, बॉस्टन स्कुल या ठिकाणी होणार आहे.

स्पर्धेत एकूण 131खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेतील विजेत्या व उप विजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी सरदार ठाकूर यांची स्पर्धा निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली असल्याचे स्पर्धा संचालक होजेफा हकीम यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments