पुणे, २ मार्च २०२४ – सोनाक्षी सिन्हा आणि सृष्टी राय यांनी परस्पर सहकार्याने सुरू केलेल्या ‘सोइझी’ या ‘प्रेस-ऑन नेल’ ब्रँडचे शोरूम पुण्यात आजपासून खुले झाले. पुण्यासारख्या उत्साहाने गजबजलेल्या शहरात आपले हे पहिले ऑफलाइन रिटेल आऊटलेट सुरू करण्याचा आपल्याला अभिमान वाटत असल्याचे या ब्रॅंडतर्फे नमूद करण्यात आले. ‘नेल ग्लॅम’च्या जगात ‘सोइझी’ने आणलेला हा सुविधा आणि शैली यांचा अनोखा संयोग साजरा करण्यासाठी एक विशेष समारंभ आयोजित करण्यात आला. या समारंभात रुपाली हसीजा, आशना भगवानी आणि शौर्य सनाढ्य यांसारखे नामवंत प्रभावकार उपस्थित होते.
‘सोइझी’ची नाविन्यपूर्ण उत्पादने या समारंभात प्रदर्शित करण्यात आली. या उत्पादनांविषयी परस्परसंवादी अनुभव यावेळी मांडण्यात आले. व्यावसायिक नेल आर्टिस्ट्सनी अतिशय कौशल्याने सादर केलेले सोइझीच्या प्रिमियम ‘प्रेस-ऑन नेल्स’चे थेट प्रात्यक्षिक यावेळी उपस्थितांना दाखविण्यात आले. येथील कियॉस्कचे उत्कंठामय वातावरण आणि आकर्षक डिस्प्ले यांतून ‘सोइझी’ची रंगीबेरंगी आणि वेगवेगळ्या डिझाइनधील नेल टिप्सची विस्तृत श्रेणी उपस्थितांसमोर उलगडली जात होती. इतकेच नव्हे, तर ‘सोइझी’तर्फे यावेळी एक मजेदार ट्रिव्हिया चॅलेंज सादर करण्यात आले आणि अतिथींनाही त्यामध्ये सहभागी होण्याची संधी देण्यात आली. ‘सोइझी’चे खास डिझाईन असलेले, गुलाबी रंगाची पार्श्वभूमी असलेले बूथ हे तर अतिथींमध्ये मोठेच आकर्षणाचे केंद्र बनले. अनेकांनी तिथे सेल्फी घेऊन आपला आनंद इतरांशी शेअर केला.
सोनाक्षी आणि सृष्टी यांनी मोठ्या उत्साहात आपल्या या नव्या स्टोअरचे गुणवर्णन केले. “आमच्या या व्यवसायाची प्रगती ऑनलाईन स्वरुपात मोठ्या प्रमाणात होत आहे आणि आता आमच्या ऑफलाइन प्रवासाला सुरुवात झाली आहे. आम्ही खूप उत्साहित आहोत. आमच्या उत्पादनांचा अनुभव घेण्यासाठी उत्सुक असलेले नवीन ग्राहक आता या स्टोअरमध्ये थेट येतील आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा एक चांगला अनुभव आम्हालाही मिळेल. बाजारपेठेत आक्रमकरित्या प्रवेश करण्याच्या आमच्या धोरणाची ही सुरूवात आहे. या प्रकारचे कियॉस्क देशभरात उभारण्याचे आमचे उद्दिष्ट आहे,” असे त्या म्हणाल्या.
‘सोइझी’ने रिटेल स्टोअरमध्ये मांडण्याच्या दृष्टीने काही खास, अनोखी कलेक्शन्स सादर करण्याचा, त्याचबरोबर, भविष्यात व्हर्च्युअल ट्राय-ऑन आणि नाविन्यपूर्ण भागीदारी करण्याचेही नियोजन केले आहे.
अगणित रंगछटा व अनोखे डिझाईन अशी वैशिष्ट्ये असलेला, सर्व नेल बेड्सवर सुरळीतपणे बसू शकेल असा, सार्वत्रिक आकाराचा २४ नेल टिप्सचा अद्वितीय संच किऑस्कच्या माध्यमातून आता ‘सोइझी’च्या ग्राहकांना सहजपणे उपलब्ध होणार आहे. ‘इझी डूइट-यूअरसेल्फ’ पद्धतीने नखांवर नेल टिप्स लावण्याची व काढण्याची प्रक्रिया ग्राहकांना अगदी सहजतेने जमेल आणि सुंदर नखांचा आनंद त्यांना घेता येईल; त्यांचा वेळ आणि पैसा या दोन्हींची बचत साध्य होईल; तसेच सोय, साधेपणा आणि शैली या सोइझीच्या वैशिष्ट्यांची कायमची छाप ग्राहकांवर पडेल, याची खात्रीच येथे पटते.
—
सोनाक्षी सिन्हा आणि सृष्टी राय यांचा ‘सोइझी’ हा ब्रॅंड पुण्यात दाखल
RELATED ARTICLES


