पुणे, 18 जानेवारी 2026: भारत एका ऐतिहासिक क्षणाच्या उंबरठ्यावरउभा असून, बजाज पुणे ग्रँड टूर 2026 ला 19 जानेवारीपासून सुरुवात होतआहे. ही स्पर्धा पुरुषांसाठीची भारतातील पहिलीच कॉन्टिनेंटल बहुपर्यायी(मल्टी-स्टेज) रोड सायकलिंग स्पर्धा असून, तिला युनियन सायक्लिस्टइंटरनॅशनल (UCI) कडून 2.2 श्रेणीची आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालीआहे. UCI च्या अधिकृत चौकटीत समावेश झाल्याने, बजाज पुणे ग्रँड टूर2026 द्वारे भारताचा जागतिक व्यावसायिक सायकलिंग कॅलेंडरमध्येअधिकृत प्रवेश झाला आहे.
बजाज पुणे ग्रँड टूरचा UCI कॅलेंडरमध्ये समावेश अशा वेळी झाला आहे, जेव्हा आशिया खंड व्यावसायिक सायकलिंगसाठी वेगाने वाढणारीबाजारपेठ म्हणून उदयास येत आहे. पायाभूत सुविधा, खेळाडू घडवणूकआणि आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक अनुभव यामधील वाढती गुंतवणूक पाहता, भारताचा या स्तरावरील स्पर्धेत प्रवेश हा देशातील सायकलिंगच्याव्यावसायिकीकरणासाठी दीर्घकालीन दृष्टीकोन अधोरेखित करतो.
UCI मान्यतेमुळे, पुणे ग्रँड टूर 2026 मधील सायकलपटूंना मौल्यवानजागतिक क्रमवारी गुण (रँकिंग पॉइंट्स) मिळवण्याची संधी मिळणार असून, हे गुण लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिक पात्रतेसाठी ग्राह्य धरले जाणारआहेत. ही स्पर्धा सोमवारपासून सुरू होणार असून, पहिल्या दिवशी प्रोलॉग(वैयक्तिक टाइम ट्रायल) घेण्यात येईल. या फेरीत नोंदवलेल्या वेळेनुसारपुढील पहिल्या टप्प्यासाठी (स्टेज 1) संघांची पोल पोझिशन निश्चित केलीजाईल.
मोरोक्कोचा सिदी अली अनलॉक्स स्पोर्ट्स टीम (UCI जागतिक क्रमवारी157) अनपेक्षित कारणांमुळे स्पर्धेतून माघार घेतल्याने, आता 28 संघांमधील164 सायकलपटू 35 देशांचे प्रतिनिधित्व करत पाच खंडांतून प्रारंभ रेषेवरउतरतील. मोरोक्कोच्या अनुपस्थिती असूनही, भारताने UCI 2.2 श्रेणीतीलस्पर्धेसाठी आतापर्यंत कधीही न पाहिलेली सर्वात मोठी स्पर्धक संख्यानोंदवण्याचा मान मिळवला आहे. साधारणतः या श्रेणीतील स्पर्धांमध्ये सुमारे125 सायकलपटू सहभागी होत असतात. पहिल्याच वर्षी, बजाज पुणे ग्रँडटूर 2026 मध्ये आशियातून सर्वाधिक 78 सायकलपटू सहभागी होत असून, त्याखालोखाल युरोपमधून 69 सायकलपटू सहभागी झाले आहेत. ओशनिया, अमेरिका आणि आफ्रिका खंडातूनही दमदार उपस्थिती असून, हीस्पर्धा खऱ्या अर्थाने जागतिक स्वरूपाची ठरत आहे.
स्पेनचा बुर्गोस बर्पेलेट बीएच संघ हा बजाज पुणे ग्रँड टूर 2026 मधीलप्रेक्षकांचा आवडता संघ मानला जात आहे. जागतिक क्रमवारीत 29व्यास्थानावर असलेला हा एकमेव प्रो-टीम स्तरावरील संघ असून, त्यांनी व्हुएल्टाआ एस्पान्यासारख्या प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये सातत्याने सहभाग घेतला आहे. अव्वल स्थानासाठी चीनचा ली निंग स्टार (जागतिक क्रमवारी 33) आणिमलेशियाचा तेरेन्गानू सायकलिंग टीम (जागतिक क्रमवारी 38) हे संघकडवी झुंज देणार असून, पहिल्या पुणे ट्रॉफीसाठी फोटो-फिनिशची अपेक्षाव्यक्त केली जात आहे.
बजाज पुणे ग्रँड टूरमधील अव्वल सहा UCI जागतिक क्रमवारीतील संघ
1. बुर्गोस बर्पेलेट बीएच – स्पेन (क्रमवारी: 29)
2. ली निंग स्टार – चीन (क्रमवारी: 33)
3. तेरेन्गानू सायकलिंग टीम – मलेशिया (क्रमवारी: 38)
4. रोजाई इन्शुरन्स विनस्पेस (क्रमवारी: 44)
5. क्विक प्रो टीम – एस्टोनिया (क्रमवारी: 68)
6. टार्टेलेटो–इसोरेक्स – बेल्जियम (क्रमवारी: 78)
भारतीय आव्हानाचे नेतृत्व राष्ट्रीय संघ करणार असून, त्यात हरियाणाचेसाहिल कुमार आणि दिनेश कुमार, महाराष्ट्राचा सूर्य थाथू, पंजाबचेविश्वजीत सिंग आणि हर्षवीर सिंग सिखों, तसेच कर्नाटकचा एम. नवीनजॉन या अनुभवी सायकलपटूंचा समावेश आहे. याशिवाय, इंडियनडेव्हलपमेंट टीम चा समावेश हा बजाज पुणे ग्रँड टूरचा महत्त्वपूर्ण आणिस्वागतार्ह निर्णय ठरला असून, यामुळे भारताच्या दुसऱ्या संघालाआंतरराष्ट्रीय अनुभव मिळण्यास आणि भविष्यातील प्रगत स्पर्धांसाठीआत्मविश्वास वाढवण्यास मदत होणार आहे.
भारतीय सायकलपटूंकरिता पुणे ग्रँड टूर ही देशांतर्गत मैदानावरच जगातीलसर्वोत्तम संघांविरुद्ध स्पर्धा करण्याची दुर्मिळ संधी आहे. आंतरराष्ट्रीयदर्जाच्या शर्यतींची रणनीती, व्यावसायिक संघांचे डावपेच आणि UCI स्तरावरील स्पर्धात्मक वातावरण यांचा अनुभव देशांतर्गत आणि जागतिकस्तरातील दरी भरून काढण्यात मोलाची भूमिका बजावेल.
पुणे ग्रँड टूर 2026 – टप्पानिहाय मार्ग
स्पर्धेचे टप्पे
• 19 जानेवारी 2026: प्रोलॉग (7.5 किमी) – गुडलक चौक
• 20 जानेवारी 2026: टप्पा 1 – मुळशी–मावळ माइल्स (87.2 किमी | उंची 828 मी.)
• 21 जानेवारी 2026: टप्पा 2 – मराठा हेरिटेज सर्किट (105.3 किमी | उंची 1051 मी.)
• 22 जानेवारी 2026: टप्पा 3 – वेस्टर्न घाट्स गेटवे (134 किमी | उंची1024 मी.)
• 23 जानेवारी 2026: टप्पा 4 – पुणे प्राइड लूप (95 किमी | उंची 578 मी.)
स्पर्धेच्या समारोपप्रसंगी विजेत्यांना पुण्यातील प्रसिद्ध तांबट आळी येथीलकारागिरांनी घडवलेली हाताने बनवलेली तांब्याची ट्रॉफी प्रदान करण्यातयेईल. शर्यतीच्या मार्गावर असलेल्या आठ ऐतिहासिक किल्ल्यांपासून आणिछत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यपर परंपरेपासून प्रेरित असलेली हीट्रॉफी, पुण्याच्या समृद्ध वारशाचे आणि हस्तकलेचे प्रतीक आहे.
उलटी गिनती सुरू झाल्याने, बजाज पुणे ग्रँड टूर 2026 ही केवळ एक शर्यतन राहता, जागतिक दर्जाच्या सायकलिंग स्पर्धांचे आयोजन करण्यासाठीभारत पूर्णपणे सज्ज असल्याचा ठाम संदेश देणारी ठरणार आहे.


