Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedपॉप्युलर व्हेइकल्स अॅंड सर्व्हिसेस लि.ची प्राथमिक समभाग विक्री येत्या १२ मार्चपासून सुरू

पॉप्युलर व्हेइकल्स अॅंड सर्व्हिसेस लि.ची प्राथमिक समभाग विक्री येत्या १२ मार्चपासून सुरू

प्रत्येकी २ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सचा आयपीओसाठी किंमतपट्टा २८० रु. ते २९५ रु. निश्चित.

· आयपीओसाठीची बोली खुली होणार मंगळवारी, दि. १२ मार्च २०२४ रोजी आणि बंद होणार गुरुवारी, दि. १४ मार्च २०२४ रोजी. अँकर गुंतवणूकदारांसाठी बोलीचा दिवस सोमवार, दि. ११ मार्च २०२४.

· गुंतवणूकदारांना किमान ५० इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यापुढे ५० इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल बोली.

· इक्विटी शेअरची फ्लोअर प्राईज दर्शनी मूल्याच्या १४० पट, तर कॅप प्राईस १४७.५० पट.

· आमच्या कंपनीसाठी २०२३ या आर्थिक वर्षामध्ये डायल्युटेड ईपीएसवर गणण्यात आलेले किंमत-उत्पन्न गुणोत्तर (पीई रेशो) हे किंमत-पट्ट्याच्या कमाल मूल्याच्या २८.८६ पट आहे. या तुलनेत, इतर समान उद्योगांमधील सरासरी पीई रेशो ३४.८४ पट असतात.

· आरएचपी लिंक :

https://www.icicisecurities.com/Upload/ArticleAttachments/Popular%20Vehicles%20and%20Services%20Ltd_RHP.pdf

राष्ट्रीय, ६ मार्च, २०२४ : पॉप्युलर व्हेइकल्स अँड सर्व्हिसेस लिमिटेड (“पीव्हीएसएल” किंवा “कंपनी”) या कंपनीची प्राथमिक समभाग विक्री येत्या मंगळवारी, दि. १२ मार्च २०२४ रोजी खुली होणार आहे.

या आयपीओमध्ये २५० कोटी रुपयांच्या (२५०० दशलक्ष रु.) इक्विटी शेअर्सचा फ्रेश इश्यू आणि १,१९,१७,०७५ इक्विटी शेअर्सच्या विक्रीचा प्रस्ताव (ऑफर फॉर सेल) अशी ऑफर देण्यात येत आहे.

एकूण ऑफरचा किंमतपट्टा २८० ते २९५ रुपये प्रति इक्विटी शेअर असा निश्चित करण्यात आला आहे. गुंतवणूकदारांना किमान ५० इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर ५० इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावता येईल.

अँकर गुंतवणूकदारांच्या बोलीची तारीख सोमवार, ११ मार्च २०१४ ही असेल. बोली / ऑफर मंगळवार, १२ मार्च २०२४ रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि गुरुवार, १४ मार्च २०२४ रोजी बंद होईल.

कर्मचाऱ्यांसाठी काही शेअर्स राखीव ठेवण्यात आले असून त्यांकरीता बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रति इक्विटी शेअर २८ रुपयांची सूट दिली जाईल.

कंपनीला आयपीओमधून मिळणारा निधी हा कंपनीने किंवा तिच्या उपकंपन्यांनी, म्हणजे पीएडब्ल्यूएल, पीएमएमआयएल, केजीपीएल, केसीपीएल व पीएमपीएल यांनी, घेतलेल्या १९२ कोटी रुपयांच्या एकूण कर्जांच्या संपूर्ण अथवा अंशतः परतफेडीसाठी किंवा पूर्व-फेडीसाठी वापरण्याचा, तसेच त्यातील शिल्लक रक्कम इतर सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी खर्चण्याचा कंपनीचा प्रस्ताव आहे.

आयपीओच्या ऑफर फॉर सेलमध्ये बॅनयनट्री ग्रोथ कॅपिटल टू, एलएलसी (म्हणजे, प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर) यांच्याकडील १,१९,१७,०७५ इक्विटी शेअर्सचा समावेश आहे.

कंपनीच्या या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे ऑफर करण्यात आलेले इक्विटी शेअर्स हे ४ मार्च २०२४ रोजी एर्नाकुलम (“आरओसी”) (“आरएचपी”) येथे रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, केरळ यांच्याकडे दाखल केले गेले आहेत. बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड या स्टॉक एक्सचेंजमध्ये ते सूचीबद्ध करण्याचा कंपनीचा प्रस्ताव आहे.

या ऑफरच्या उद्दिष्टांसाठी नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड हे स्टॉक एक्सचेंज नियुक्त करण्यात आले आहे.

पृष्ठ ४१५ पासून सुरू होणारी ‘ऑफर प्रक्रिया’ पाहा.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड (पूर्वाश्रमीची एडलवाईस सिक्युरिटीज लिमिटेड) आणि सेंट्रम कॅपिटल लिमिटेड या कंपन्यांना या ऑफरसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नेमण्यात आले आहे.

येथे नमूद झालेल्या, परंतु परिभाषित न केलेल्या सर्व कॅपिटलाइझ्ड संज्ञांचा अर्थ आरएचपीमध्ये वर्णन केल्याप्रमाणे गृहीत धरावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments