मुंबई, भारत, 12 मार्च, 2026: भारतातील आघाडीची मोफत स्ट्रिमिंग सेवा असलेल्या अॅमेझॉन एमएक्स प्लेयरने आज 2026 साठी 150 हून अधिक नवीन आणि परतून येणाऱ्या कार्यक्रम (रिटर्निंग शो)चे अनावरण करत, आतापर्यंतच्या सर्वात विस्तृत कलाकृतींची घोषणा केली. शैली, स्वरूप आणि कथाकथन प्रकारांमध्ये विस्तारलेल्या कलाकृती देशभरातील प्रेक्षकांना या वैविध्यपूर्ण कथा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून उच्च दर्जाची करमणूक देणाऱ्या मंचाच्या ध्येयाला बळकटी देते.
कलाकृतींच्या गुलदस्त्यात अग्रस्थानी असलेल्या प्रमुख शीर्षकांपैकी नसिरुद्दीन शाह आणि जिम सर्भ अभिनीत ‘मेड इन इंडिया: द टायटन स्टोरी’ हे महत्त्वाकांक्षा आणि वारसा निर्माण करण्यावर केंद्रित प्रेरणादायी नाट्य आहे. नाना पाटेकर, संजय कपूर, नीरज काबी आणि मोहम्मद झीशान अयूब यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘संकल्प’ हा सत्ता तसेच नेतृत्व पैलूंचा शोध घेणारा एक मनोरंजक सामाजिक-राजकीय थ्रीलर आहे.
न्याय, सूडबुद्धी आणि थरार या संकल्पनांवरील ‘अब होगा हिसाब’, ज्यात शाहीर शेख, मौनी रॉय आणि संजय कपूर झळकणार आहेत. तसेच अमोल पराशर अभिनीत ‘द ब्युरोक्रॅट’सारख्या प्रशासकीय नाट्य पाहता येईल. साकिब सलीम अभिनीत ‘कप्तान’, सनी हिंधुजा अभिनीत ‘विमल खन्ना’, दिव्येंदु शर्मा आणि भुवन अरोरा अभिनीत कॉप ड्रामा ‘वेटिंग है’ सोबतच रवी किशन, अमेय वाघ आणि विशाल जेठवा अभिनीत ‘क्लीन अप क्रू’ हा क्राइम ड्रामा झळकणार आहे. एकत्रितपणे, या कलाकृती अॅमेझॉन एमएक्स प्लेअरची व्याप्ती आणि विकसित होणारी सर्जनशील दृष्टी प्रतिबिंबित करतात. कारण त्या प्रेक्षकांसाठी उत्कृष्ट कथानके घेऊन येणार आहेत.
राजीव खंडेलवाल, आमिर अली, रवी बहल आणि बरखा बिष्ट यांच्या भूमिका असलेला ‘अमर विश्वास’ हा कायद्यावरील कोर्टरूम ड्रामा अलीकडच्या कलाकृतींनी निर्माण केलेल्या जोरदार वातावरणात आगामी पर्याय तयार करतो आहे. अशाप्रकारची विविधांगी पैलू असलेली कथानकं प्रेक्षकांना अधिक भावतात. तेजस्वी प्रकाश आणि रवी किशन अभिनीत ‘सायको सैयां’ या रोमँटिक थ्रीलरने प्रखर कथानकांसह प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारी कलाकृती बनवली आहे.
अॅमेझॉन एमएक्स प्लेयर अनेक यशस्वी फ्रँचायझींचा विस्तार प्रेक्षकांना आवडणाऱ्या नवीन सीझनसह करेल. ज्यात रक्तांचल सीझन 3, सोबतच तरुणाईच्या पसंतीच्या कॅम्पस बीट्स सीझन 6, कॅम्पस डायरीज सीझन 2, हार्टबीट्स सीझन 2 आणि हू इज योर गायनॅक सीझन 2 चा समावेश आहे. या कलाकृतींच्या परतून येणाऱ्या आवृत्त्या नाट्य, युवा संस्कृती आणि नातेसंबंध-आधारित कथाकथनातील प्रेक्षकांशी ‘सर्व्हिस-कनेक्शन’ मजबूत करत राहतात.
अनस्क्रिप्टेड प्रकारात, अॅमेझॉन एमएक्स प्लेयर आपला फ्लॅगशिप रिअॅलिटी शो राईज अँड फॉल सीझन 2 पुन्हा घेऊन येतो आहे. (ऑल3मीडिया इंटरनॅशनलद्वारे परवानाधारक आणि मूळतः यूकेमधील स्टुडिओ लॅम्बर्ट निर्मित) जो त्याच्या पदार्पणाच्या हंगामात सर्व्हिसवरील सर्वाधिक चर्चेत असलेल्या कार्यक्रमांपैकी एक म्हणून उदयास आला. बॅटलग्राऊंड सीझन 2 ही भारताची पहिली आणि एकमेव फिटनेस रिअॅलिटी मालिका आहे. ज्यात शिखर धवन मुख्य मार्गदर्शकाच्या वेशात दिसेल. या सर्व्हिसने अलीकडेच सुनील शेट्टीच्या ‘भारत के सुपर फाउंडर्स’ चा देखील समारोप केला. ज्यात पात्र स्टार्टअप्सना ₹100 कोटी रुपयांचा निधी मिळाला. ज्यामुळे प्रभावी, मोठ्या प्रमाणात अनस्क्रिप्टेड प्रोग्रामिंगमध्ये अॅमेझॉन एमएक्स प्लेयरची वाढती उपस्थिती बळकट झाली.
अॅमेझॉन एमएक्स प्लेअरच्या 2026 कंटेंट स्ट्रॅटेजीचा एक प्रमुख स्तंभ म्हणजे एमएक्स फटाफटचा निरंतर विस्तार, त्याचा अग्रणी मायक्रो-ड्रामा फॉरमॅट जे मोबाइल-प्रथम, गुंतवून ठेवणारे कथाकथन उपलब्ध करून देते. जपानी आणि हिंदी भाषेत उपलब्ध असलेल्या अॅनिमे शो’च्या खास निवडलेल्या कलाकृती, कोरिया, चीन आणि तुर्कीमधील स्थानिकीकृत आंतरराष्ट्रीय कंटेंटचे भारतातील सर्वात मोठा संग्रह खुला करून ही सेवा एमएक्स विदेसीला आणखी बळकट करत आहे.
अॅमेझॉन अॅडस् इंडियाचे प्रमुख गिरीश प्रभू म्हणाले, “आमची 2026 कंटेंट स्लेट आणि 25 कोटींहून अधिक वापरकर्त्यांपर्यंत पोहोच, अॅमेझॉन एमएक्स प्लेयर ब्रँडसाठी मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्याची एक शक्तिशाली संधी निर्माण करते. उच्च दर्जाचे कथाकथन मुक्तपणे उपलब्ध करून, आम्ही खोलवर गुंतलेले प्रेक्षक आणि जाहिरातदारांना एकाच ठिकाणी एकत्र आणतो. यामुळे ब्रँड क्षणिक लक्ष्याच्या पलीकडे जाऊ शकतो. खरेदी तसेच स्ट्रिमिंग सिग्नलद्वारे समर्थित इमर्सिव्ह कंटेंट अनुभवांद्वारे प्रेक्षकांशी जोडले जाऊ शकतात. जे ब्रँड शोधसोबत मोजता येण्याजोग्या परिणामांना चालना देतात.”
अॅमेझॉन एमएक्स प्लेयरचे प्रमुख करण बेदी म्हणाले, “अधिक प्रेक्षक विनामूल्य, प्रीमियम स्ट्रिमिंग स्वीकारत असल्याने अॅमेझॉन एमएक्स प्लेयरला जोरदार गती दिसत आहे. आमच्या वाढत्या प्रीमियम कंटेंट स्लेट आणि प्रमाणामुळे, आम्ही भारतभरातील लाखो प्रेक्षकांसाठी लिनीयर टेलिव्हिजनवरून स्ट्रीमिंगमध्ये बदल घडवून आणण्यासाठी अद्वितीय स्थितीत आहोत.”
अॅमेझॉन एमएक्स प्लेयरचे कंटेंट प्रमुख अमोघ दुसाद म्हणाले, “अॅमेझॉन एमएक्स प्लेयरमध्ये, देशभरातील प्रेक्षकांचे अनेक आवाज, संस्कृती आणि अनुभव प्रतिबिंबित करणारी वैविध्यपूर्ण आणि सर्वसमावेशक कंटेंट इकोसिस्टम तयार करण्यावर आमचे लक्ष केंद्रित आहे. स्क्रिप्टेड सिरीज आणि मायक्रो ड्रामापासून ते अनस्क्रिप्टेड स्वरूपांपर्यंत, समकालीन भारतात विशिष्ट, अस्सल आणि खोलवर रुजलेल्या कथा आणण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. उत्कृष्ट कथाकथनाची ही विस्तृत श्रेणी सादर करून, आकर्षक मनोरंजन सर्वत्र प्रेक्षकांसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध राहील हे सुनिश्चित करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”
अॅमेझॉन एमएक्स प्लेअरच्या उत्पादन, तंत्रज्ञान आणि मार्केटिंग प्रमुख अरुणा दर्यानानी म्हणाल्या, “अॅमेझॉन एमएक्स प्लेअरच्या प्रेक्षकांची वेगवान वाढ जाहिरातदारांच्या स्वीकाराला चालना देत आहे. ज्यामुळे आकर्षक कंटेंट, दर्शकांची व्यस्तता आणि ब्रँड भागीदारी यांच्यात एक शक्तिशाली उड्डाणपूल तयार होत आहे.”
2026 च्या कलाकृती दाखल होत असताना, भारतभरातील प्रेक्षक अॅमेझॉन एमएक्स प्लेयरवर सर्व कार्यक्रम विनामूल्य स्ट्रिमिंग करू शकतात. जे मोबाईल, कनेक्टेड टीव्ही, अॅमेझॉन शॉपिंग अॅप, प्राइम व्हिडिओ, फायर टीव्ही, जिओ टीव्ही
आणि एअरटेल एक्सट्रीमवर उपलब्ध आहेत.


