Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedतनिष्कचे नवे 'डोर मंगळसूत्र कलेक्शन', संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या आधुनिक मराठी महिलेच्या सन्मानार्थ,...

तनिष्कचे नवे ‘डोर मंगळसूत्र कलेक्शन’, संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या आधुनिक मराठी महिलेच्या सन्मानार्थ, गुढीपाडव्यासाठी ब्रँडची खास भेट

संस्कृतीमध्ये रुजलेले एक विशेष कलेक्शन, जे महाराष्ट्राच्या ‘मनस्विनी’चा सन्मान करते, अशी मराठी महिला जी परंपरांशी घट्ट नाते जोडून आहे, आत्मविश्वास आणि अभिमानाने संस्कृतीचा वारसा पुढे चालवत आहे

 

पुणे, १३ मार्च २०२६: पुण्यातील घराघरांतून नवसंकल्पांची आणि लग्नसराईच्या आगमनाची शुभसूचक गुढी उभारण्याची तयारी सुरु असताना, भारतातील सर्वात मोठा ज्वेलरी रिटेल ब्रांड आणि टाटा समूहाचा एक भाग ‘तनिष्क’, महाराष्ट्रातील ‘मनस्विनी’च्या सन्मानार्थ एक विशेष मोहीम सादर करत आहे. ही मोहीम स्वाभिमानी मराठी महिलेला समर्पित आहे, जी आपल्या परंपरांचा आदर राखत, अभिमानाने आणि स्वतःच्या खास शैलीत त्या पुढे नेत आहे. या सांस्कृतिक उत्सवाचे औचित्य साधून, तनिष्कने खास गुढीपाडवा मंगळसूत्र कलेक्शन—’डोर’ प्रस्तुत केले आहे; जे महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा आणि आजच्या आधुनिक मराठी स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वातून प्रेरित होऊन तयार करण्यात आले आहे.

 

या उत्सवाचे औचित्य साधून, तनिष्कने आधुनिक मराठी स्त्रीच्या सन्मानार्थ आपली पहिली प्रादेशिक कॅम्पेन फिल्म सादर केली आहे. ही फिल्म तिच्या दैनंदिन जीवनातील संस्कृती, स्वाभिमान आणि तिचे वेगळेपण अधोरेखित करते; तसेच याच भावनेचे प्रतिबिंब असलेल्या ‘डोर’ कलेक्शनला अतिशय जिवंतपणे साकारते. प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट हिच्या सहजसुंदर अभिनयाने ही फिल्म अधिकच उठावदार झाली आहे. या फिल्मची कथा ‘डोर’ कलेक्शनला अभिमान, ओळख आणि सामाजिक बांधिलकीचे एक मौल्यवान प्रतीक म्हणून अतिशय सुंदररीत्या गुंफते. आधुनिक मराठी स्त्री आपला वारसा अभिमानाने कसा पुढे नेत आहे, याचे दर्शन या कथेतून घडते. अस्सल सांस्कृतिक बारकावे आणि मनाला भिडणाऱ्या मांडणीमुळे, तनिष्क हा ब्रँड मराठी संस्कृती आणि त्यातील आत्मीयता केंद्रस्थानी ठेवणारा ब्रँड म्हणून अधोरेखित होतो.

 

‘चंद्र डोर’ — एक असे मंगलसूत्र ज्यात पेशवाई वैभव आणि मराठा साम्राज्याची शान सामावलेली आहे. याची उत्कृष्ट ‘गोल्ड फिनिश’ आणि अलंकृत ‘वाटी’, मराठा राजघराण्यातील शालीनता आणि सांस्कृतिक समृद्धीचे दर्शन घडवते. मंदिरांची वास्तुकला आणि सूर्यकिरणे दर्शवणाऱ्या नक्षीकामातून प्रेरित हा दागिना, नाजूक ‘फिलीग्री’ काम आणि ‘वार्म अँटिक गोल्ड’च्या अप्रतिम कारागिरीने सजलेला आहे. हे केवळ एक आभूषण नसून, वारसा आणि आधुनिकता यांना जोडणारा एक सोनेरी दुवा आहे.

 

‘डोर’ कलेक्शनच्या निमित्ताने प्रथमच सादर होत आहे अतिशय आगळेवेगळे ‘बनारसी इनॅमल मंगलसूत्र’; जे नाजूक मीनाकारी, कलात्मक फुलांची नक्षी आणि सळसळत्या ‘इनॅमल’ रंगांचा एक अद्भूत संगम आहे. हे कलेक्शन शतकानुशतके चालत आलेल्या कलेला आधुनिक आणि समकालीन रूप देते. यातील मुख्य आकर्षण म्हणजे ‘कमल डोर’— एक अतिशय प्रभावी दागिना, ज्यामध्ये उमललेल्या कमळाच्या नक्षीसह बनारसी इनॅमलची जिवंत कारागिरी दिसून येते. याला काळ्या मण्यांच्या दुहेरी पदरी माळेने जोडले गेले आहे, जे या डिझाइनचा राजेशाही थाट आणि त्याचे प्रतिकात्मक महत्त्व अधिकच वाढवते.

 

इतकेच नाही तर, हे कलेक्शन ठुशी, कोल्हापुरी साज आणि शिंदेशाही तोडे यांसारख्या प्रतिष्ठित महाराष्ट्रीयन दागिन्यांना एक नवे रूप देते. यात ग्लास कुंदन, सूक्ष्म मीनाकारी आणि बारीक ‘बादरूम’ वर्कचा सुंदर मिलाप असून, वारसा आणि आधुनिक शैलीची सुरेख सांगड असलेले हे कलेक्शन लग्नसराईसाठी सुयोग्य आहे. रिव्हर्सिबल वज्रटिक हार आणि ठुशी ही एकाच दागिन्यात दोन रूपे—एका बाजूला नक्षीदार प्लेन गोल्ड आणि दुसऱ्या बाजूला कुंदन वर्क; जे शालीनता आणि परंपरेचा संगम आहे. कोल्हापुरी साजापासून प्रेरित नथीला महाराष्ट्रीयन वारशाचा आदर राखत नव्या आणि आकर्षक रूपात साकारले आहे. मोरपंखी इयर कफ आणि झुमका ही वज्रटिक नक्षीने सजलेली कलाकृती, धाडसी कल्पकता आणि उत्कृष्ट कारागिरीचा एक अजोड नमुना आहे. हे ‘डोर’ कलेक्शन आजच्या मराठी स्त्रीसाठी एक आधुनिक भेट आहे, जी परंपरा, शैली आणि स्वतःची स्वतंत्र ओळख यांचा सुवर्णमध्य साधते.

 

‘डोर’ कलेक्शन म्हणजे महाराष्ट्राची पारंपरिक कला आणि आधुनिक रचनांचा एक सुरेख संगम आहे. मंगळसूत्राचे पारंपरिक महत्त्व जपत, यात ‘वाटी’ आणि मण्यांना एका नव्या आणि मोहक पद्धतीने गुंफले आहे. यातील प्रत्येक डिझाइन अशा महिलेसाठी घडवले आहे, जी आपली संस्कृती अतिशय साध्या आणि तरीही खास शैलीत जपते. हे दागिने केवळ तिची स्वतःची ओळखच नाही, तर समाजाप्रती असलेली तिची ओढ आणि बांधिलकी देखील दर्शवतात —जसे की या फिल्ममध्ये अतिशय देखण्या पद्धतीने मांडले गेले आहे.

 

टाइटन कंपनी लिमिटेडच्या चीफ मार्केटिंग ऑफिसर, पेल्की त्शेरिंग यांनी या लाँच प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना म्हटले: “महाराष्ट्राची संस्कृती येथील महिलांच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने आणि अतिशय देखण्या पद्धतीने जिवंत राहते—मग तो परंपरा जोपासण्याचा अभिमान असो, त्यांनी जपलेले संस्कार असोत किंवा ती मूल्ये, जी त्या दररोज आत्मविश्वासाने पुढे नेत आहेत. ‘मनस्विनी’ हीच भावना एका शांत आत्मविश्वासाने जगतात; त्या पिढ्यानपिढ्या चालत आलेला वारसा जपतात आणि त्याला आजच्या आधुनिक काळाचा साजही चढवतात. तनिष्कसाठी महिला नेहमीच केंद्रस्थानी राहिली आहे—तीच आमची प्रेरणा आहे आणि तिच्यातूनच आमचे डिझाइन्स आकाराला येतात. ही मोहीम महाराष्ट्रातील त्या ‘मनस्विनीं’ना आमचा मानाचा मुजरा आहे, ज्या परंपरेचा आदर राखून तिला एक नवे रूप देत आहेत. अशा कथा आणि आमच्या डिझाइन्सच्या माध्यमातून, आम्ही त्या महिलांच्या जिद्दीचा उत्सव साजरा करतो, ज्या संस्कृतीचे जतन करतात, तिला नवा आयाम देतात आणि अभिमानाने पुढे नेतात.”

 

कलेक्शन आणि त्यातील डिझाइन्सबद्दल अधिक माहिती देताना, तनिष्कच्या हेड ऑफ डिझाइन, गरिमा माहेश्वरी म्हणाल्या: “हे विशेष ‘डोर मंगळसूत्र कलेक्शन’ साकारताना, आपली संस्कृती स्वतःच्या आगळ्यावेगळ्या शैलीत जोपासणारी आजची आधुनिक मराठी स्त्री हीच आमची प्रेरणा होती. आम्ही महाराष्ट्रातील पारंपरिक कलेचा, जसे की ‘पेशवाई’ आणि ‘कोल्हापुरी’ कलेचा सखोल अभ्यास केला आणि त्यांना आजच्या काळातील मंगळसूत्र डिझाइन्समध्ये गुंफले आहे. नाजूक मीनाकारी आणि फुलांच्या सुंदर नक्षीकामापासून ते खास तयार केलेली ‘वाटी’ आणि काळ्या मण्यांच्या आकर्षक माळांपर्यंत—प्रत्येक दागिना हा परंपरेचा आदर राखण्यासाठी आणि आजच्या स्त्रीचे व्यक्तिमत्व अधिक खुलवण्यासाठी घडवला गेला आहे.”

 

या लॉन्चमध्ये सहभागी होत असल्याबद्दल, प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट म्हणाल्या: “या कॅम्पेनची जी गोष्ट मला सर्वात जास्त भावली, ती म्हणजे हे कॅम्पेन मराठी स्त्रीच्या अस्मितेचे अगदी हुबेहूब दर्शन घडवते. आपली संस्कृती अनेकदा आपल्या रोजच्या छोट्या-मोठ्या निवडींमधूनच झळकत असते—मग ती आपली वेशभूषा असो, आपले सण असोत किंवा आपण जपलेल्या परंपरा असोत. ही फिल्म नेमकी हीच गोष्ट अतिशय देखण्या पद्धतीने मांडते. तनिष्कने स्त्रियांच्या आवडीनिवडी आणि गरजांची समज केवळ खास प्रसंगांपुरती मर्यादित न ठेवता, त्या पलीकडे जाऊन त्या भावना आणि मूल्यांची दखल घेतली आहे, जी आपली खरी ओळख निर्माण करतात. स्त्रियांना ‘संस्कृतीच्या रक्षक’ म्हणून सादर करणाऱ्या एका कथेचा भाग होणे माझ्यासाठी खूप मोलाचे आहे; कारण ही कथा सांगते की परंपरा आपल्या माध्यमातून आजही कशा जिवंत आहेत आणि काळानुसार कशा विकसित होत आहेत.”

 

उत्सवाच्या या शुभ मुहूर्तावर, ग्राहकांना प्रत्येक दागिन्यांच्या खरेदीवर सोन्याचे नाणे मोफत भेट म्हणून मिळेल. तसेच, हिऱ्यांच्या मूल्यावर २० टक्क्यांपर्यंत सूट आणि कोणत्याही सराफाकडून घेतलेल्या जुन्या सोन्यावर १०० टक्के एक्सचेंज व्हॅल्यूचा लाभ घेता येईल. गुढीपाडव्याची ही विशेष ऑफर पुण्यातील सर्व तनिष्क स्टोअर्समध्ये १४ मार्च ते २० मार्च २०२६ या मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे. ग्राहकांनी या सुवर्णसंधीचा नक्की लाभ घ्यावा, असे आवा

हन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments