Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्वराज्य रक्षक धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त वाहतूक बदल*

स्वराज्य रक्षक धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त वाहतूक बदल*

 

 

पुणे, दि. 16 (जि.मा.का.): मौजे वढू बुद्रुक येथे स्वराज्य रक्षक धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि. १७ मार्च २०२६ रोजी रात्री १० ते दि. १८ मार्च २०२६ रोजी रात्री १०.०० पर्यंत परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम ११५ अन्वये दिले आहेत.

 

कोरेगाव भिमा बाजूकडून चाकण-पाबळकडे जाणारी अवजड वाहतूक कोरेगाव भिमा-सणसवाडी-शिक्रापूर-गॅस फाटा-वाजेवाडी चौफुला मार्गे वळविण्यात येणार आहे. तसेच चाकण-पाबळकडून पुण्याकडे येणारी अवजड वाहतूक वाजेवाडी चौफुला-गॅस फाटा-शिक्रापूर-सणसवाडी-कोरेगाव भिमा मार्गे वळविण्यात येईल.

 

कोरेगाव भिमा बाजूकडून येणाऱ्या भाविकांच्या वाहनांना संस्थेजवळील ठरविण्यात आलेल्या स्टॉपेज पॉईंटच्या पुढे जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच चाकण व पाबळ मार्गे येणाऱ्या भाविकांच्या वाहनांना वढू-वाजेवाडी चौफुला मार्गावरील पार्किंग स्टॉपेज पॉईंटच्या पुढे जाण्यास परवानगी राहणार नाही.

मात्र व्ही.व्ही.आय.पी., व्ही.आय.पी. तसेच शासकीय वाहनांना या निर्बंधातून वगळण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments