Tuesday, October 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedवर्ल्ड ऑफ परफॉर्मिंग आर्टस (डब्ल्यूओपीए) विंटर फेस्टिव्हलचा समारोप देख बहन...

वर्ल्ड ऑफ परफॉर्मिंग आर्टस (डब्ल्यूओपीए) विंटर फेस्टिव्हलचा समारोप देख बहन -भाग 2 या नाटकाने होणार

पुणे,18 मार्च 2026 : वर्ल्ड ऑफ परफॉर्मिंग आर्टस (डब्ल्यूओपीए) तर्फे आयोजित दुसऱ्या पर्वातील डब्ल्यूओपीए विंटर फेस्टीव्हलचा समारोप समारंभ क्रिएटिसिटी ॲम्फी थिएटर येथे होणार आहे. शनिवार,21 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता देख बहन -भाग 2 या नाटकाने विंटर फेस्टिव्हलची सांगता होणार आहे. या नाटकामध्ये विनोद,मैत्री आणि धमाल यांचा मेळ प्रेक्षकांना पाहता येणार आहे.देख बहन हे एक उत्साही,सुख-दुखाच्या छटा असलेली विनोदी नाटक असून यात आस्था अरोरा,दिलशाद एदिबाम,लिशा बजाज,प्रेरणा चावला,शिखा तलसानिया आणि इतर कलाकारांनी भूमिका साकरल्या आहेत.या नाटकाचे दिग्दर्शन प्रेरणा चावला आणि शिखा तलसानिया यांनी केले आहे.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments