Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedराज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-2025 साठी  प्रवेशिका पाठविण्याकरीता मुदतवाढ

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-2025 साठी  प्रवेशिका पाठविण्याकरीता मुदतवाढ

 

 

 

मुंबई, दि.१९ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2025 ते 31 डिसेंबर, 2025 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका मागविण्याचा अंतिम दिनांक 15 मार्च, 2026 असा होता. सदर पुरस्कारांसाठी प्रवेशिका मागविण्याकरीता दि. 31 मार्च, 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून आणि मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील स्पर्धकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. तसेच अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध

आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments