मुंबई, दि २३: भारतीय स्वातंत्र्य लढ्यात उल्लेखनीय योगदान देणारे क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांना शहीद दिनानिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव हेमंत महाजन, अवर सचिव रामदास कोळेकर, कक्ष अधिकारी निलेश हरड, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, विजय शिंदे यांनीही तिन्ही शहिदांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.


