पुणे १३ मे २०२६ : बर्जर पेंट्स इंडिया लिमिटेड चा ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी आर्थिक अहवाल जाहीर करण्यात आला . एकत्रित तिमाही अहवालाची वैशिष्टे लक्षात घेता ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीत कामकाजातून मिळणारा महसूल रु. २,८६८.० कोटी होता. त्यात मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीतील रु. २,७०४.० कोटींच्या तुलनेत ६.१ टक्के वाढ दिसून आली. निव्वळ नफा रु. ३३५.३ कोटी होता. त्यात मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीतील रु. २६२.९ कोटींच्या तुलनेत २७.५ टक्के वाढ दिसून आली.
एकत्रित वार्षिक अहवालाची वैशिष्ट्यांमध्ये ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या वर्षासाठी कामकाजातून मिळणारा महसूल रु. ११,८८०.३ कोटी होता. त्यात मागील आर्थिक वर्षातील रु. ११,५४४.७ कोटींच्या तुलनेत २.९ टक्क्यांची वाढ दिसून आली. निव्वळ नफा रु. १,१२८.० कोटी होता. त्यात मागील आर्थिक वर्षातील रु. १,१८२.८ कोटींच्या तुलनेत ४.६ टक्क्यांची घट दिसून आली.


