Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedटाटा मोटर्सच्या चौथ्या तिमाही नफ्यात ४९ टक्के वाढ, आर्थिक वर्ष २०२६ ठरले...

टाटा मोटर्सच्या चौथ्या तिमाही नफ्यात ४९ टक्के वाढ, आर्थिक वर्ष २०२६ ठरले ऐतिहासिक

 

 

पुणे, १४ मे २०२६: टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेड (TMPVL) ने जानेवारी ते मार्च 2026 या चौथ्या तिमाहीचा आणि आर्थिक वर्ष २०२६ साठीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. देशांतर्गत मजबूत मागणी आणि जेएलआर व्यवसायातील सुधारणा यामुळे आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीमध्ये उत्पन्न ₹१८.७. हजार कोटी झाले. ज्यामध्ये ४९% वाढ झाली.

 

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष 2025-26 च्या चौथ्य़ा तिमाहीत कंपनीचे एकत्रित उत्पन्न अंदाजे १०५.४ हजार कोटींवर पोहोचले आहे. गतवर्षीच्या तुलनेत त्यात अंदाजे ७.२ टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीचा व्याज आणि करापूर्वीचा नफा (ईबीआयटी) अंदाजे ८.९ हजार कोटी होता. जेएलआर उत्पादन पुन्हा सुरळित झाल्यामुळे आणि देशांतर्गत वाहनांच्या विक्रमी विक्रीने कंपनीच्या कामगिरीत तिमाही-दर-तिमाही मोठी सुधारणा झाली. याच काळात कंपनीने ₹11.4 हजार कोटींचा मजबूत रोख प्रवाह नोंदवला.

 

नुकत्याच संपलेल्या २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी कंपनीचे एकूण उत्पन्न अंदाजे ३३५.६ हजार कोटी रुपये झाले. कंपनीचा व्याज आणि करोत्तर नफा (EBITDA) मार्जिन ६.८ टक्के तर ईबीआयटीचे मार्जिन १.१ टक्के राहिले. मात्र, वर्षभर JLR ला सायबर घटना, टॅरिफ, चीनमधील लक्झरी कर आणि वाढलेले कमोडिटी खर्च यांसारख्या आव्हानांचा सामना करावा लागला.

 

देशांतर्गत व्यवसायातही कंपनीने जोरदार कामगिरी केली. टाटा पॅसेंजर व्हेइकल्सचे आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीमध्ये उत्पन्न ₹१८.७. हजार कोटी झाले. ज्यामध्ये ४९% वाढ झाली. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी एकूण उत्पन्न ₹५८.५ हजार कोटी राहिले. वाहन मार्केट शेअर १४.२% पर्यंत वाढला असून ईव्ही सेगमेंटमध्ये ४०.२% शेअर कायम ठेवण्यात कंपनीला यश आले आहे.कंपनीच्या संचालक मंडळाने भागधारकांच्या मंजुरीनंतर प्रति शेअर ₹3 अंतिम लाभांश देण्याची शिफारस केली आहे.

 

EV क्षेत्रात टाटा मोटर्सने आपले नेतृत्व अधिक मजबूत करत २.५ लाखांहून अधिक ईव्ही विक्रीचा टप्पा पार केला. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ईव्ही विक्री ९२ हजार युनिट्सच्या पुढे गेली असून ४३% वाढ नोंदवली. नेक्साँन आणि पंच ही मॉडेल्स अनुक्रमे सर्वाधिक विक्री होणारी वाहने ठरली.

 

उत्पादन क्षेत्रात कंपनीने नवीन सिएरा सादर केली, तसेच हॅरियर आणि सफारी मॉडेल्सना नवीन 1.5L HYPERION Turbo-GDi पेट्रोल इंजिन दिले. याशिवाय Harrier.ev आणि Punch.ev लॉन्च करून EV पोर्टफोलिओचा विस्तार करण्यात आला. कंपनीने दक्षिण आफ्रिकेच्या बाजारातही पुनर्प्रवेश केला असून Panapakkam येथे नवीन उत्पादन सुविधा उभारली आहे.

 

टीएमपीव्हीएलचे सीएफओ धिमान गुप्ता यांनी सांगितले की, “आर्थिक वर्ष २०२६ हे दोन टप्प्यांचे वर्ष होते. देशांतर्गत बाजारात मजबूत वाढ दिसली, तर JLR व्यवसायाला काही आव्हानांचा सामना करावा लागला. मात्र चौथ्या तिमाहीमध्ये सर्व आर्थिक निर्देशांकांमध्ये सुधारणा दिसून आली.”

 

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ शैलेश चंद्रा यांनी सांगितले, “ आर्थिक वर्ष २०२६ हे आमच्यासाठी ऐतिहासिक वर्ष ठरले. आम्ही 6.4 लाखांहून अधिक युनिट्सची विक्रमी वार्षिक विक्री नोंदवली आणि उद्योगापेक्षा जास्त १५% वाढ साध्य केली. ईव्ही सेगमेंटमध्येही आमचे नेतृत्व अधिक मजबूत झाले आहे.” कंपनी पुढील काळात जागतिक आव्हानांवर लक्ष ठेवत देशांतर्गत मागणीचा लाभ घेत नफा आणि वाढ कायम ठेवण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments