Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedबीएनसीए आणि रशियातील यातीगोरस्क विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार वास्तूरचनाशास्त्रातील शिक्षण व विद्यार्थी...

बीएनसीए आणि रशियातील यातीगोरस्क विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार वास्तूरचनाशास्त्रातील शिक्षण व विद्यार्थी आदान-प्रदान यांचा त्यात समावेश

पुणे, दि. १५ : महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेन (बीएनसीए) ने शैक्षणिक आणि विद्यार्थी आदान प्रदान कार्यक्रमांतर्गत रशियातील यातीगोरस्क विद्यापीठाशी वास्तूरचनाशास्त्र शिक्षलणातील मार्गदर्शन यावर नुकताच पाच वर्षांसाठी सामंजस्य करार केला आहे. या निमित्ताने दोन्ही शैक्षणिक संस्थांमध्ये संयुक्तपणे कार्यशाळा, चर्चासत्रे आणि परिषदांचे आयोजन करण्यात येत आहे.

 

हा करार बीएनसीएचे प्राचार्य डॉ.अनुराग कश्यप, संस्थेच्या आंतरराष्ट्रीय कक्षाच्या प्रमुख डॉ. श्रुती जोशी तसेच रशियातील यातीगोरस्क विद्यापीठातील उपसंचालक डिझाईन आर्किटेक्चरच्या विभागप्रमूख डॉ. एलिना रूबेट्स आणि विद्यापीठातील वसतिगृहाचे प्रमुख अलेक्झांडर गोर्गुनाव्ह यांच्यात झाला.

 

यासंबंधी बोलताना डॉ. कश्यप म्हणाले की, हा करार केवळ दोन देशांमधील वास्तूरचना शास्त्राच्या शिक्षणापुरता मर्यादित नसून त्यामध्ये दोन्ही देशांमधील ज्ञान संस्कृती आणि संशोधन यांच्यातही सहकार्याची भूमिका घेतली जात आहे.

 

या कराराचा एक भाग म्हणून बीएनसीए मधील प्राध्यापक सुरभी गडकरी आणि पूजा घोरपडे यांनी याती गोरस्क विद्यापीठासाठी नुकतीच एक कार्यशाळा घेतली.

 

त्यामध्ये या विद्यापीठातील ४५ विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. हे शिक्षण इंग्रजीतून देण्यात आले असून त्यासाठी रशियन भाषांतरकाराची मदतही घेण्यात आली. या कार्यशाळेचा पुढचा टप्पा जुलैमध्ये पूर्ण केला जाईल, असे डॉ. श्रुती जोशी यांनी सांगितले.

 

या कार्यशाळेबद्दल एलिना रूबेट्स यांनी बीएनसीएचे आभार मानले असून ही कार्यशाळा आमचे विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यासाठी एक प्रेरणादायी अनुभव होता. या कार्यशाळेतून आमच्या विद्यार्थ्यांना वास्तूरचनाशास्त्र शिक्षणात नवीन दृष्टिकोन अनुभवायला मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.

 

या कार्यशाळेत वास्तूरचनाशास्त्रासाठी उपयुक्त असणाऱ्या हीनो सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला असून डिजिटल फॅब्रिकेशन, डिजिटल मॉडेलींग, थ्रीडी प्रिंटींग, सीएनसी मिलींगच्या मदतीने साकारण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांची माहिती देण्यात आली. तसेच मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष कार्यानुभव यातून विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली, असे मार्गदर्शक प्रा. सुरभी गडकरी यांनी

सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments