Wednesday, October 7, 2026
Google search engine
HomeUncategorized*पुणे जिल्ह्याची स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक जाहीर ; आचारसंहिता लागू*

*पुणे जिल्ह्याची स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक जाहीर ; आचारसंहिता लागू*

 

 

पुणे, दि. १८ : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील द्वैवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठीही निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संबंधित मतदारसंघात आचारसंहिता तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे.

 

जाहीर कार्यक्रमानुसार २५ मे २०२६ रोजी अधिसूचना प्रसिद्ध होणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १ जून २०२६ आहे. अर्जांची छाननी २ जून रोजी होईल, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ४ जून २०२६ निश्चित करण्यात आली आहे.

 

या निवडणुकीसाठी मतदान १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत होणार आहे. मतमोजणी २२ जून २०२६ रोजी होणार असून २५ जूनपूर्वी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

 

निवडणूक आयोगाने संबंधित प्रशासनाला आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments