Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारत विकास परिषद व समवेदना संस्थेतर्फे महिलांसाठी हिमोग्राम व ब्रेस्ट कॅन्सर...

भारत विकास परिषद व समवेदना संस्थेतर्फे महिलांसाठी हिमोग्राम व ब्रेस्ट कॅन्सर तपासणी मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

 

पुणे

(प्रतिनिधी)

भारत विकास परिषद कोथरूड आणि समवेदना,यांच्या संयुक्त विद्यमाने वय १५ ते ५० या गटातील सेवा वस्तीतील मुली व स्त्रिया यांचे साठी रक्त तपासणी ( हिमोग्रम ) तसेच स्त्रियांसाठीचा कर्करोग पूर्व निदान तपासणी (ब्रेस्ट कॅन्सर) साठी शिबिर आयोजित केले होते. डॉ अरुण निरंतर,डॉ अलका निरंतर यांनी तपासणी केली.समवेदना संस्थेच्या समन्वयक अबोली खोंडे व सहकारी यांच्या सहकार्याने ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी केली.ज्यांचे हिमोग्लोबिन कमी आढळले त्यांचेवर मोफत औषधोपचार करण्यात येतील तसेच ज्या स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरची शक्यता आढळते त्यांना पुढील ट्रीटमेंट साठी समवेदना संस्था मार्गदर्शन करते.

हॅप्पी कॉलनी च्या सभागृहामध्ये हे मोफत शिबिर

मंगळवार दिनांक १९ मे रोजी सकाळी साडे दहा ते दुपारी अडीच वाजेपर्यंत आयोजित केले होते.भारत विकास परिषद,कोथरूड शाखा,समवेदना संस्था,साई पॅथॉलॉजी आणि हॅपी कॉलनी सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजिले होते.यामध्ये पन्नास महिलांनी लाभ घेतला.हे शिबिर घेण्यासाठी साठी विनोद दप्तरदार,डॉ शिल्पा हलदुले,एअर व्हाइस मार्शल जयंत इनामदार ( निवृत्त ),माधुरी जयंत इनामदार,भारत विकास परिषदेचे कोथरूड शाखेचे अध्यक्ष संजीव दिवाण सचिव स्मिता जोशी यांनी पुढाकार घेतला.

ठाणे जनता सहकारी बँक,साई पॅथॉलॉजी यांचे सहकार्य लाभले.

शिबिर यशस्वितेसाठी श्रीधर अनगळ,प्रदीप ओक,शिल्पा दिवाण,अजय बोरवणकर,जयंत साने,गीता कुलकर्णी,स्वाती खांडेकर,राजश्री अभ्यंकर,श्यामकांत उकिडवे,दिलीप लिमये यांनी परिश्रम घेतले.

 

भारत विकास परिषद कोथरुड शाखा आणि समवेदना संस्था यांच्यातर्फे हे मोफत शिबिर आयोजित केले होते.हॅपी कॉलनी,गोसावी वस्ती,डहाणूकर कॉलनी परिसर मधील पन्नास महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments