“कलाली (कलारी) बोलीलील पहिलाच काव्य संग्रह ठरलेला प्राचार्य
डॉ. रामदास चवरे यांचा
‘असो चैतको मयना’ हा
कविता संग्रह रसिक मनाला साद घालणारा आहे. शब्दांचे हृदयस्पर्शी नाद आणि जीवनाची विविध रूपे येथे साक्षात होत जातात, असे गौरवोद्गार मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर यांनी
या कविता संग्रहाचे प्रकाशन करताना काढले.
डॉ. आवलगावकर पुढे म्हणाले की, मराठीतील विविध बोलींपैकी समजल्या जाणाऱ्या कलाली बोली बोलणाऱ्यांची महाराष्ट्र व इतर राज्यातही बरीच संख्या आहे. मराठीतील प्रसिद्ध लेखक, कवी, गीतकार, समीक्षक, संशोधक असलेल्या प्राचार्य डॉ. रामदास चवरे यांच्या 75 कवितांचा प्रस्तुत कविता संग्रह कलाल समूहाचे दु:ख, दैन्य, वेदना, विविध न्यास यांचा तलस्पर्शी आविष्कार ठरावा. ” महाराष्ट्र शासन व मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे नुकत्याच संपन्न झालेल्या बोली अभ्यासक कार्यशाळेत या कविता संग्रहाचे प्रकाशन समारंभात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर
गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे (कुलगुरू, भाषा संचालक
अरुण गिते,राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक
मराठी भाषा विद्यापीठाचे
कुलसचिव डॉ. सुबोध भांडारकर हे उपस्थित होते.


