Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedअटक ते कटक मराठा साम्राज्याचा नकाशा’  अभ्यासक्रमात पुन्हा समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी  ‘महाराष्ट्र...

अटक ते कटक मराठा साम्राज्याचा नकाशा’  अभ्यासक्रमात पुन्हा समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी  ‘महाराष्ट्र धर्म मोर्चा’चे आयोजन*

 

 

*छत्रपती वृषालीराजे भोसले प्रमुख मार्गदर्शक*

 

पुणे, दि. 20  : हिंदू पदपादशाही आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासाच्या गौरवासाठी शुक्रवारी, दि. २२ रोजी सकाळी ९ वाजता ‘महाराष्ट्र धर्म मोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे. लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा निघणार असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज सातारा गादीच्या छत्रपती वृषालीराजे भोसले या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

 

‘अटक ते कटक मराठा साम्राज्याचा नकाशा’ या संकल्पनेवर आधारित या मोर्चाद्वारे मराठा इतिहासाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. आयोजकांनी महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारशी संवाद साधून अटक येथील मराठा साम्राज्याच्या नकाशाची पुनर्स्थापना करावी,  सदर विषयाला राज्य शासनाने अधिकृत भूमिका देऊन महाराष्ट्रातील जनतेच्या भावना केंद्र शासनापर्यंत ठामपणे पोहोचवाव्यात आदि मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

 

“ज्यांनी स्वाभिमान पाळला तोच खरा नकाशा आहे,” असा संदेश देत या मोर्चासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments