पुणे, दि.२६ : जूनमध्ये पक्की अनुज्ञप्ती मिळण्याच्यादृष्टीने पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली आहे.
पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी २, ३ आणि ४ जून २०२६ रोजी खेड, ८, ९ आणि १० जून रोजी मंचर, १५, १६ आणि १७ जून रोजी जुन्नर, २२, २३ आणि २४ जून रोजी वडगाव मावळ आणि २९ आणि ३० जून २०२६ रोजी लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्क्या अनुज्ञप्तीसाठी २९ मे २०२६ रोजी दुपारी ५.०० वाजता कोटा उपलब्ध होणार आहे, असेही कळविण्यात आले आहे.


