Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedसमाजाच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्यांचा सन्मान इतरांसाठी प्रेरणादायी – महापौर रवि लांडगे

समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्यांचा सन्मान इतरांसाठी प्रेरणादायी – महापौर रवि लांडगे

विविध क्षेत्रातील २६ मान्यवरांचा ‘सरस्वती भूषण गुणगौरव पुरस्कार २०२६’ ने गौरव

 

पिंपरी, दि. २९ मे २०२६ : समाजाच्या उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणे ही समाजाची जबाबदारी आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान झाल्याने नव्या पिढीला प्रेरणा मिळते आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होते, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांनी केले.

 

ऑल स्पोर्ट्स अँड मार्शल आर्ट्स फेडरेशन ऑफ पुणे यांच्या वतीने कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २६ मान्यवरांचा ‘सरस्वती भूषण गुणगौरव पुरस्कार २०२६’ देऊन महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते महापौर कार्यालयात गौरव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

 

या प्रसंगी फेडरेशनचे अध्यक्ष सुनील साठे, सचिव मनोज सोनावणे तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान इरा सोनावणे यांनी महापौर रवि लांडगे यांच्या कार्यावर आधारित स्वलिखित कवितेचे सादरीकरण केले. त्यांच्या प्रभावी सादरीकरणास उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.

 

यावेळी बोलताना महापौर रवि लांडगे म्हणाले की, समाजातील सकारात्मक परिवर्तनासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती या समाजाच्या खऱ्या प्रेरणास्थान असतात. कला, क्रीडा, शिक्षण, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव केल्याने त्यांच्या कार्याला अधिक बळ मिळते. पिंपरी चिंचवड शहरातील अशा गुणवंत व्यक्तींना भविष्यातही प्रोत्साहन व पाठबळ देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

 

सन्मानित मान्यवर

 

मनोज साळवे (क्रीडा महर्षी पुरस्कार २०२६), सम्यक कांबळे (कराटे क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य), श्री. पाटील (उत्कृष्ट स्पोर्ट्स अकादमी), जितेंद्र शिंगारे (कराटे क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य), इस्प्रित कटारिया (उत्कृष्ट बॉक्सिंग खेळाडू), उर्मिला जाधव (शैक्षणिक नेतृत्वातील दूरदृष्टीकोन पुरस्कार), दिपाली भादुले (योगा व झुंबा क्षेत्रातील उत्कृष्ट शिक्षक), डॉ. मंजुषा इंगवले (वनस्पतीशास्त्र विभागातील उत्कृष्ट शिक्षक), विश्वास गरजमल (समाजरत्न पुरस्कार), युवराज मनोहर कांबळे (उत्कृष्ट कराटे खेळाडू), आकाश (अभिनय व मॉडेलिंग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य), विजय भस्मे (आर्टिफिशियल स्मार्ट टीचर), हेमराज थापा (क्रीडा महर्षी पुरस्कार २०२६), सुधा ढवळे (कबड्डी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य), गणेश ठोकळ (प्रभावी शिवव्याख्याते), सुदेश गायकवाड (क्रीडा महर्षी पुरस्कार २०२६), राजेंद्र कांबळे (यशस्वी उद्योजक), जितू कटारिया (उत्कृष्ट बॉक्सिंग प्रशिक्षक), धर्मपाल भरणे (युवा उद्योजक), रोहित आढागळे (उत्कृष्ट स्केटिंग प्रशिक्षक), श्रीधरण थांबा (हॉकी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य), श्वेता लिमन (मार्शल आर्ट क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य), मयंक कांबळे (कराटे क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य), प्रतिभा भोसले (अभिनय व मॉडेलिंग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य), रमेश शेलार (कराटे क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य) आणि पूजा भोसले (यशस्वी उद्योजक) यांचा यावेळी सन्मान

करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments