Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedगुरुवर्य दादोजी कोंडदेव"  व  "नाटककार राम गणेश गडकरी" यांच्या...

गुरुवर्य दादोजी कोंडदेव”  व  “नाटककार राम गणेश गडकरी” यांच्या पुतळ्यांची पुनर्स्थापना करावी- महापौरांकडे मागणी

 

 

पुणे. “गुरुवर्य दादोजी कोंडदेव”

“नाटककार राम गणेश गडकरी”

यांच्या पुतळ्यांची पुनर्स्थापना करावी या मागणीसाठी आज सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने मा. महापौर मंजुषा नागपुरे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.

यावेळी भालचंद्र कुलकर्णी, विश्वजित देशपांडे, संदीप खर्डेकर, मंदार रेडे, विश्वनाथ भालेराव, मकरंद माणकिकर, मनोज तारे, सौ. तृप्ती तारे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे की–

 

पुणे महापालिकेच्या छत्रपती संभाजी उद्यानात (जंगली महाराज रोडवरील) नुकतेच छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले, याबद्दल सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने आपले मनापासून अभिनंदन करीत आहोत. शंभूराजांचा तेजस्वी पुतळा तितक्याच सुशोभनीय पध्दतीने बसवण्यात आला आहे, याचा आम्हा सर्वांना अत्यंत आनंद आहे.

काही समाजकंटकांच्या चिथावणीखोर वक्त्यव्यांमुळे तसेच सामाजिक सौहार्दता टिकवण्यासाठी काही महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजी उद्यानातील श्रेष्ठ नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा काढून टाकण्यात आला आहे. श्रेष्ठ लेखक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते आचार्य प्र. के. अत्रे यांनी हा पुतळा संभाजी उद्यानात बसवला होता. त्यामुळे सदरच्या राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याची सुयोग्य ठिकाणी सन्मानाने पुनर्स्थापना करावी अशी आमची मागणी आहे.

त्याचबरोबर काही वर्षांपूर्वी लाल महालात असलेल्या गुरुवर्य दादोजी कोंडदेव यांचा पुतळा देखील सामाजिक असंतोषामुळे काढून टाकला होता व सद्यस्थितीत हा पुतळा सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानात वाईट अवस्थेत पडून आहे. सदरचा पुतळा देखील पुणे शहरात सुयोग्य ठिकाणी पुन्हा सन्मानाने बसवण्यात यावा अशी आमची सर्वांची एकमुखी मागणी आहे.

आम्ही खालील सह्या करणारे सकल ब्राह्मण समाज (पुणे शहर) पदाधिकारी म्हणून प्रातिनिधीक सह्या करीत आहोत. पुणे शहरातील सुमारे ३५ ब्राह्मण संस्था / संघटना या सकल ब्राह्मण समाज संघटनेच्या सदस्य आहेत. पुणे शहरातील सर्वच समाजातील महापुरुषांच्या जयंती / पुण्यातिथीनिमित्ताने संबंधित पुतळ्यांबाबत पुणे महापालिका सन्मानाने यथोचित कार्यक्रम करीत असते, अशा वेळी वरील नमूद दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्यांचा सन्मान राखून त्यांची सुयोग्य ठिकाणी पुनर्स्थापना करावी व सन्मान राखला जावा, अशी आमची आग्रहाची मागणी व विनंती आहे.

 

समन्वय समिती सदस्य –

सूर्यकांत पाठक, मंदार रेडे, चैतन्य जोशी, सुनिल पारखी, समीर गाडगीळ, विश्वनाथ भालेराव, अतुल व्यास, सौ. पद्मा जोशी, श्रीकांत जोशी, राजेंद्र कुलकर्णी, राजेश कुलकर्णी, अमित शहाणे, मनोज तारे, विजय शेकदार, मनोज पांचारिया, अजय दाते, रमेश भागवत, मयुरेश अरगडे, शामराव कुलकर्णी, विश्राम कुलकर्णी, मोहन मुंगळे, ह्रषिकेश सुमंत, सचिन वाडे-पाटील, गिरीश शेवडे, स्मिता इंदापूरकर, उदय लेले, सौ. सुजाता मवाळ, मकरंद माणकीकर, सागर मांडके, कुंदनकुमार साठे आहेत

🙏🙏

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments