Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedविधान परिषद निवडणुक काॅंग्रेस नेत्यांचा संवाद

विधान परिषद निवडणुक काॅंग्रेस नेत्यांचा संवाद

 

 

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे,अध्यक्ष दीप्तीताई चवधरी,

राष्ट्रवादीचे नेते ,गटनेते चंदू कदम ,काँग्रेस भवन येथे काँग्रेस पक्षाचे नगरसेवक यांच्याशी चर्चा करण्यासाठी काँग्रेस भवन येथे आले होते

यावेळी प्रदीर्घ काळानंतर रंगल्या राजकीय गप्पा आणि आणि पत्रकारांशी संवाद

 

पुणे:

महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज पुणे येथील ऐतिहासिक काँग्रेस भवनला भेट दिली. या प्रसंगी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व माजी महापौर जिल्हा पुणे पश्चिम विभागाच्या नवनियुक्त शहराध्यक्षा दीप्तीताई चवधरी, ज्येष्ठ नेते अंकुश काकडे आणि चंदू कदम यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. प्रदीर्घ कालावधीनंतर काँग्रेस भवन येथे झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

 

या सदिच्छा भेटीदरम्यान नेत्यांमध्ये आगामी राजकीय दिशा, महाविकास आघाडीची पुढील रणनीती आणि पुण्याच्या स्थानिक विकासात्मक मुद्द्यांवर सकारात्मक व सविस्तर चर्चा झाली. बऱ्याच दिवसांनंतर झालेल्या या एकत्रित भेटीत जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला, तसेच महाविकास आघाडीची वज्रमूठ अधिक मजबूत करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.

 

पत्रकारांशी साधला उत्स्फूर्त संवाद !

भेट झाल्यानंतर सर्व नेत्यांनी संयुक्तपणे प्रसारमाध्यमांशी (प्रेस) संवाद साधला. या वेळी बोलताना नेत्यांनी सांगितले की, “काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संबंध हे केवळ राजकीय नसून कौटुंबिक आणि वैचारिक आहेत. आजची ही भेट आगामी काळातील संघर्षाला आणि महाविकास आघाडीच्या ऐक्याला नवी ऊर्जा देणारी ठरेल.”

 

या वेळी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे इतर प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments