पुणे, दि. २ (जिमाका, वृत्तसेवा): प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे मालवाहतूक, टुरिस्ट टॅक्सी, बस व अॅम्ब्युलन्स या परिवहन संवर्गातील वाहनांसाठी नवीन नोंदणी मालिका सुरु करण्यात येत आहे. यासाठी ज्यांना खाजगी वाहनांना आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक विहित शुल्क (तीनपट व नियमित शुल्क) भरून हवे असतील त्यांनी ४ जून रोजी सकाळी ११ ते दुपारी २.३० या दरम्यान डीडी, पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र व पॅनकार्डच्या साक्षांकित प्रती जोडून जमा करावा.
एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्यांची यादी ५ जून रोजी सकाळी १०.३० वाजता कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल व त्याच दिवशी दुपारी ४.३० वाजता लिलाव प्रक्रिया करण्यात येईल.
ज्या मालवाहू, टुरिस्ट टॅक्सी, बस व अॅम्ब्युलन्स संवगांतील वाहनांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरुन हवे असतील त्यांनी दिनांक ५ जून रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी ११ ते दुपारी २.३० या दरम्यान विहित नमुन्यातील अर्जामध्ये कार्यालयाच्या परिवहन विभागात जमा करावेत. यामध्ये एकाच नंबरकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी दिनांक ८ जून रोजी सकाळी १०.३० वाजता कार्यालयीन नोटीसबोर्डवर लावण्यात येईल. सदर अर्जासाठी त्याच दिवशी दुपारी ४.३० वाजता परिवहन विभागात लिलाव करण्यात येईल.
एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. राखीव नोंदणी क्रमांक मिळाल्यानंतर १८० दिवसांच्या आत वाहन नोंदणीसाठी सादर न केल्यास संबंधित क्रमांक आपोआप रद्द होईल व भरलेली फी शासन खात्यात जमा होईल. कोणत्याही परिस्थितीत राखीव नोंदणी क्रमांकाकरिता भरलेली फी परत न करण्यात येणार नाही तसेच तिचे कोणतेही समायोजन करता येणार नाही. असे उप प्रादेशिक परिहवन अधिकारी पुणे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
0000


