Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedजप्त वाहनांचा ऑनलाईन ई-लिलाव १० जून रोजी*

जप्त वाहनांचा ऑनलाईन ई-लिलाव १० जून रोजी*

 

 

पुणे, दि.२: प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड यांच्या वायुवेग पथकाने मोटार वाहन कायद्याअंतर्गत विविध गुन्ह्यांमुळे जप्त केलेली, तसेच मोटार वाहन कर न भरल्याने आणि संबंधितांनी हक्क सांगून न सोडवून घेतलेली एकूण ९३ वाहने ऑनलाईन ई-लिलावाद्वारे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. ई-लिलाव १० जून २०२६ रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ४ या वेळेत www.mstcindia.co.in⁠ या संकेतस्थळावर आयोजित करण्यात येईल. सदर वाहनांचा लिलाव ‘भंगार’ स्वरूपात करण्यात येणार असून, Registered Vehicle Scrapping Facility (RVSF) संस्थांना या लिलावात सहभाग घेता येणार आहे.

 

 

लिलावासाठी ठेवण्यात आलेली सर्व वाहने प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड कार्यालयाच्या आवारात, राजगुरूनगर बस डेपो व मंचर बस डेपो येथे उपलब्ध असून इच्छुक कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी व वेळेत प्रत्यक्ष पाहणी करता येणार आहे.

 

 

दरम्यान, संबंधित वाहन मालक, चालक, वित्तदाते किंवा हितसंबंधित व्यक्तींना लिलावाच्या तारखेपूर्वी शासकीय महसूल भरून किंवा आवश्यक कागदपत्रांसह हक्क सिद्ध करून वाहने सोडवून घेण्याची अंतिम संधी देण्यात आली आहे. तसेच लिलावाबाबत कोणतीही हरकत असल्यास ती लेखी स्वरूपात पुराव्यासह सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निर्धारित कालावधीनंतर कोणतीही हरकत ग्राह्य धरली जाणार नाही. ई-लिलावातील वाहनांची यादी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड येथे सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर ई-लिलाव रद्द करणे किंवा तहकूब ठेवण्याचा अधिकार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा कराधान प्राधिकारी, पिंपरी चिंचवड यांनी स्वतःकडे राखून ठेवला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments