मुंबई,दि.०३ : मुलुंड येथील मुक्ता साळवे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह येथे सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाकरीता रिक्त असणाऱ्या जागेवर प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. इच्छुक विद्यार्थिनींनी प्रवेशासाठी संपर्क साधावा,असे आवाहन वसतिगृहाच्या गृहपाल यांच्या मार्फत करण्यात आले आहे.
प्रवेशित विद्यार्थिनींना वसतिगृहात राहण्याची व्यवस्था,भोजन, मासिक निर्वाह भत्ता १५०० रुपये, स्टेशनरी रक्कम, ग्रंथालय सुविधा, दैनंदिनी वर्तमानपत्र इत्यादी मोफत सोयी-सुविधा दिल्या जातात. या शैक्षणिक वर्षाचे प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने होणार असून, वसतिगृह प्रवेशाचा अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येणार आहे. तरी विदयार्थ्यांनी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर आपला अर्ज करावा.
या वसतिगृहात ११ वी व आय. टी. आय. अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनींना प्रवेश दिला जाईल. प्रवेशासाठी ५५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. विद्यार्थीनी महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे. या वसतिगृहाचा पत्ता गृहपाल मुक्ता साळवे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, डी-१० पार्श्वनाथ कॉ. हौसिंग सोसायटी, सर्वोदय नगर मुलुंड, मुंबई-४०००८० असा आहे.
0000


